मुंबई

मोपलवार खंडणीप्रकरणी तिघांची निर्दोष सुटका

CD

मुंबई, ता. १९ : सहा वर्षांपूर्वी माजी सनदी अधिकाऱ्याकडून खंडणी उकळण्याचा कट आखल्याचा आरोप असलेल्या तिघांना विशेष न्यायालयाने संशयाचा फायदा देत बुधवारी निर्दोष जाहीर केले.
तत्कालीन सनदी अधिकारी असलेले राधेश्याम मोपलवार यांच्याकडून सुमारे दहा कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याचा डाव आरोपींनी आखला होता, अशी फौजदारी फिर्यादी पोलिसांनी दाखल केली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी सतीश मांगले, त्याची पत्नी आणि निकटवर्तीय अतुल तांबेला अटक केली होती. पोलिसांनी सर्वांवर मोक्का कायद्यासह भादंवितील दरोडा, कट करणे, धमकावणे आदी आरोप ठेवले होते. सन २०१७ मध्ये ठाणे पोलिसांनी तिघांना अटक केली होती. तक्रारदार मोपलवार त्या वेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष होते. आरोपींनी त्यांची तीन वेळा भेट घेतली होती. मध्ये त्यांनी दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. मोपलवार यांना गँगस्टर रवी पुजारी टोळीकडूनही धमक्यांचा कॉल आला होता, असा दावा करण्यात आला आहे. आरोपींनी काही फोन कॉल आणि ऑडिओ क्लिप्सवरून मोपलवार यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती, असा आरोप करण्यात आला आहे.
विशेष न्या. ए. एम. पाटील यांनी बुधवारी यावर निकाल जाहीर केला. अभियोग पक्षाने दावा केलेल्या तक्रारदार आणि आरोपींच्या तीन बैठकांपैकी टोल प्लाझावर झालेल्या बैठकीत मोपलवार उपस्थित असल्याचे सिद्ध होत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या तपासात अनेक त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे याबाबत संशयाचा फायदा आरोपींना मिळतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले आणि आरोपींची सुटका करण्याचे आदेश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local : गर्दुल्यांकडून मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! दिवसाढवळ्या घडला धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT