mira road murder case love jihad live in relationship
mira road murder case love jihad live in relationship eSakal
मुंबई

Mira Road Murder Case : प्रेम म्हणजे जोडीदाराचा ‘मालकी’ हक्क नव्हे

भाग्यश्री भुवड

नात्यांमधला वाढलेला ताण, समस्या, खुंटलेला संवाद आणि यातून घराघरांत वाढलेली हिंसा याचा प्रत्यय सध्या मुंबईत घडत असलेल्या घटनांमधून समोर येत आहे. मिरा रोड येथे रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या एकाने मुलीची क्रूर हत्या करून अतिशय थंडपणे तिच्या शहराची विल्हेवाट लावली. या घटनेने समाजमन ढवळून निघाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत लिव्ह इन रिलेशनशिपमधून अनेक हत्या करण्याच्या घटना समोर येत आहेत. नात्यात कडवटपणा का आला? प्रेयसीचे तुकडे करण्याइतपत मानसिकता कशी तयार होते? मानसोपचारतज्ज्ञांकडून हे समजून घेण्याचा प्रयत्न ‘सकाळ’ने केला.

नात्यात मालकी हक्काची भावना निर्माण होते. याला प्रेम म्हणावे की आणखी काय. स्वातंत्र्य हिरावून घेणे, बाहेर जाऊ नये, कोणाशी संबंध ठेवू नये असा एकंदरीत आग्रह दिसतो. नात्यातील सलोखा संपत चालला.

एकत्र किंवा लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिले तर वेळेनंतर नात्यांत थोडे-फार बदल झाले ते स्वीकारण्याची वृत्ती लोप पावली आहे. आपले पटत नाही, आपला एकत्र राहून फायदा नाही, त्यापेक्षा वेगळे होऊन आयुष्याकडे बघणे लोक स्वीकारत नाहीत.

नात्यातून बाहेर पडणे किंवा नात्यात वेळ जाऊ देणे गरजेचे आहे. मानसिक दडपण, संयम संपला, नैराश्य आलं तरी नव्याने उभारी घेण्याची वृत्ती संपत चालली. मनाविरुद्ध काही होत असेल तर ते पचवणे शक्य होत नसल्याचे दिसून येते. आयुष्यातील समतोल संपला असून लोक आक्रमक होऊ लागले आहेत. जगण्याची धडपड आणि त्यातून तडजोड करण्याची समस्या जाणवू लागली आहे.


आक्रमकतेवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे, यासाठी सामाजिक भान, नात्यातील भान या गोष्टी महत्त्वाच्या असतात. मनावरचा लगाम सुटल्याने या गोष्टी घडू लागल्या आहेत. पूर्वी कौटुंबिक जडणघडणीमुळे अनेक गोष्टी सोप्या होत्या; मात्र आता सर्व विखुरले आहे. माणूस स्वार्थीपणाने जगू लागल्यावर अशा गोष्टी घडतात. नात्यात पटत नसले तरी मनाच्या प्रगल्भतेमुळे तडजोड होऊन नाती टाकायची; मात्र हल्ली राग आणि टोकाच्या द्वेषामुळे नात्यांतील दुरावा वाढू लागला आहे.


माध्यमातून घेतात कल्पना
समाजात अशी अनेक माणसे आहेत ज्यांना लाज, तारतम्य किंवा वाईट कृत्यांची जाणीव राहत नाही. मी केलेला गुन्हा पकडला जाणार नाही हे माहिती असल्याने हिंमत वाढते. काही नात्यांत हक्काची आणि सुरक्षित संवादाची माणसे नसतात. त्यामुळे कुणाकडे मन मोकळे करता येत नाही. माध्यमे खूप मोठी भूमिका बजावतात. काही लोक रागीट स्वभावाची असतात. रागावरचा ताबा सुटल्याने आणि भावनिक गुंतागुंत वाढल्याने विचार करण्याची क्षमताच गमावलेली असते. त्यात ओटीटी, चॅनेल, हिंसाचार आधारित सिरीयलवर हत्या करण्यापासून त्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हे सर्रास दाखवले जाते. ज्यांना आधीच मानसिक आजार किंवा विकृती असते अशी माणसे त्या दाखवलेल्या घटनांचा खऱ्याखुऱ्या आयुष्यात अवलंब करतात, असे ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी सांगितले.

आभासी जगात सर्व स्वप्नवत दिसते आणि खऱ्या आयुष्यात नाती दररोज निभवावी लागतात हे लक्षात घ्यायला हवे. वेब सिरीजमध्ये क्रूरता दाखवली जाते ते बघून अलीकडे लोक मनाप्रमाणे न झाल्यास एक घाव दोन तुकडे करण्याच्या मानसिकतेपर्यंत आली आहेत. नाते टिकवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असताना ते वापरण्याचा संयमदेखील कुणाकडे नाही.
- विभावरी पाटील, मानसोपचारतज्ज्ञ

पूर्वी आधुनिक जीवनशैली नव्हती त्या वेळी कुटुंबात एकमेकांबद्दल समंजसपणा, त्यागाची आणि आदराची भावना होती. सध्या लिव्ह इन रिलेशनमध्ये कुणीच मध्यस्थ नसतो. जेव्हा कौटुंबिक आधार तुटतो, त्यावेळी नाती ताणली जातात आणि तारतम्य सुटून हत्येपर्यंत गोष्टी जातात.
- शुभांगी पारकर, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ

स्वभावातला अतिरेक वाढला
मनुष्यात आक्रमकपणा पूर्वीपासूनच होता; मात्र आता त्याचे रूपांतर हिंसक वृत्तीत झाले आहे. स्वभावातला अतिरेकीपणा वाढल्याने या घटनांचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक नात्यात उपाय शोधणे सोपे आहे. त्यासाठी अनेक पर्याय आहेत, त्याचा योग्य वापर करता येतो.
- डॉ. मनोज भाटवडेकर, इंडियन सायकियाट्रिक सोसायटी

नात्यातला संवाद कमी झाला आहे. कौटुंबिक वादाचे प्रमाण वाढले आहे, पण घरगुती होणाऱ्या हिंसेचे गांभीर्य समजून घेण्यासाठीची व्यासपीठ कमी पडली आहेत. त्यासाठीचीच्या यंत्रणा सक्षम व्हायला हव्या. पहिल्या तक्रारीनंतर गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे. लग्नापूर्वीचे समुपदेशन ही पद्धत सुरू करावी. महिलांना कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. शिवाय, जास्तीत जास्त जागरुकता होणे आवश्यक आहे.
- रूपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT