मुंबई

School News: बनावट सीबीएसई शाळांचं रॅकेट! ठाणे, पुण्यातील शाळांची मान्यता रद्द

कोणत्याही नोंदी नसल्याचा ठपका ठेवत देशातील २० शाळांची मान्यता काढली आहे. | Alleging that there are no records, 20 schools in the country have been de-recognised.

CD

Mumbai News: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) नावाखाली शाळांमध्ये डमी विद्यार्थी दाखवणे, वाटेल तसा आर्थिक कारभार, कोणत्याही नोंदी नसल्याचा ठपका ठेवत देशातील २० शाळांची मान्यता काढली आहे. या शाळांमध्ये पुणे, ठाण्यातील एका शाळेचा समावेश आहे.


देशातील मान्यता काढलेल्या २० शाळांमध्ये राज्यातील दोन शाळांचा समावेश आहे. तर देशातील सर्वाधिक शाळा दिल्लीतील असून त्याखालोखाल उत्तर प्रदेशातील आणि छत्तीसगड-राजस्थानमधील प्रत्येकी दोन शाळा तर उर्वरित केरळ, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, मध्य प्रदेश, आसाम आदी राज्यातील प्रत्येकी एका शाळेचा समावेश आहे.(thane news )

राज्यातील दोन शाळांपैकी ठाण्यातील राहुल इंटरनॅशनल स्कूल आणि पुण्यातील पायोनिर पब्लिक स्कूल या दोन शाळांचा यात समावेश आहे. या शाळांमध्ये विविध प्रकारचे गैरप्रकार सुरू असल्याची बाब सीबीएसईला तपासणीत आढळून आली होती.

तसेच देशात मोठ्या प्रमाणात सीबीएसईच्या शाळांची संख्या वाढत असून अनेक शाळा एकदा संलग्नता आणि मान्यता घेतल्यानंतर मंडळाकडे कोणताही संबंध ठेवत नसल्याने शाळा मंडळाने दिलेल्या निकषांचे, परीक्षा आणि त्यासाठीच्या नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आले होते.(CBSC Crime News )

यामुळे कारवाईचा बडगा


या शाळांमध्ये परीक्षेच्या काळात डमी विद्यार्थी बसवून परीक्षा देत असल्याची बाब निदर्शनाला आली होती. तसेच अपात्र ठरवण्यात आलेले विद्यार्थीही यात होते. यामुळे परीक्षा आणि इतर अनेक विषयांमध्ये या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरकारभार सुरू असल्याचे मंडळाच्या निदर्शनाला आले होते.

शाळांमधील प्रवेश, संबंधित विद्यार्थी, परीक्षेला बसलेले विद्यार्थी यांच्याही नीट नोंदी ठेवण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे देशातील २० शाळांसोबत दिल्ली, पंजाब आणि आसाम येथील प्रत्येकी एका शाळेचा ग्रेडही कमी करून त्यांना अवनत करण्यात आले आहे.

इंग्रजी शाळांच्या नावाखाली राज्यातील अनेक मोठ्या शाळांमध्ये आर्थिक गैरप्रकार सुरू आहेत. शुल्क, डोनेशन आकारण्यावर कोणाचाही अंकुश नव्हता. तसेच परीक्षेला डमी विद्यार्थी बसवून आपले निकाल वाढवत असल्याने त्यांची मान्यता काढण्यात आली आहे.
- प्रवीण यादव, अध्यक्ष, फुले-शाहू-आंबेडकर पालक-विद्यार्थी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Dry Day राज्यात २९ ठिकाणी ४ दिवस ड्राय डे, १३ ते १६ जानेवारीपर्यंत मद्यपानास मनाई

Stock Market Today : जागतिक अस्थिरतेमुळे शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; सोनं मात्र तेजीत; कोणत्या शेअर्सला फटका?

T20 World Cup : बांगलादेशची ICC कडून कोंडी! देश नव्हे, फक्त शहर बदलण्याचा ठेवला प्रस्ताव; हेही मान्य न केल्यास...

Bigg Boss विजेता शिव ठाकरे अडकला विवाहबंधनात, गुपचूप बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर लग्नातले फोटो व्हायरल

MLA Sangram Jagtap: व्हीजनरी उमेदवार निवडून द्यावेत:आमदार संग्राम जगताप; सुख- दुःखात साथ देणाऱ्यांच्या पाठीशी रहा!

SCROLL FOR NEXT