Mumbai sakal
मुंबई

Mumbai News: ठाकरे गट आणि ‘वंचित’चा प्रचाराचा धडाका; महायुतीत संभ्रमाचे वातावरण

CD

Mumbai News: मुंबईतील उत्तर पश्चिम (वायव्य) लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटाने आणि दुसरीकडे ‘वंचित’ने आपले उमेदवार जाहीर करून प्रचार सुरू केला आहे, मात्र याठिकाणी महायुतीला अजूनही आपला उमेदवार निश्चित करता न आल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे उमदेवार अमोल कीर्तिकर आणि ‘वंचित’चे उमेदवार ॲड. संजीवकुमार कलकोरी यांनी प्रचारांचा जोर वाढवला आहे. या दोघांनी मतदारांच्या घरांपर्यंत जाऊन प्रचार सुरू केला असल्याने भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) महायुतीचे कार्यकर्ते उमेदवारच जाहीर नसल्याने प्रचार कोणाचा करायचा, अशा संभ्रमात सापडले आहेत.

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची जागा सुरुवातीला भाजपच्या माध्यमातून लढली जाणार होती, मात्र त्यानंतर ठाकरे गटाने गजानन कीर्तिकर यांना उमेदवारी दिल्याने या जागेवर शिंदे गटाने आपला दावा केला.

या मतदारसंघात सुरुवातीला भाजपचे अमित साटम, त्यानंतर काँग्रेसमधून बाहेर पडलेले संजय निरूपम यांचेही नाव चर्चेत आले होते. आता मात्र शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना उभे केले जाणार असून त्यासाठीची तयारीही सुरू झाली असल्याचे सांगण्यात येते. मात्र, या मतदारसंघात प्रामुख्याने चार विधानसभा क्षेत्रात भाजपचे आमदार असून केवळ दिंडोशी आणि अंधेरी पूर्वमध्ये ठाकरे गटाचे आमदार आहेत.

तरीही यादरम्यान प्रचारासाठी ठाकरे गटाचे प्रतिनिधी प्रत्येक मतदारांच्या दारापर्यंत पोहोचत असून अशीच रणनीती वंचितचे उमेदवार ॲड. संजीवकुमार कलकोरी यांनीही आखली असल्याने महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नेमका प्रचार कोणाच्या नावावर करायचा, असा संभ्रम निर्माण झाला असल्याचे सांगण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England vs Argentina: ७ मिनिटांत मॅच फिरवली! अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक; इंग्लंडचे ६० वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

SCROLL FOR NEXT