चितळसरच्या विजेत्यांना लवकरच घरांचा ताबा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : म्हाडाच्या कोकण मंडळाने वर्षभरापूर्वी काढलेल्या लॉटरीत चितळसर येथील घरांसाठी विजेते ठरलेल्यांना खुशखबर आहे. या प्रकल्पातील इमारतीचे काम पूर्ण झाले असून, आठवडाभरात भोगवटा प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे संबंधितांना लवकरच घराचा ताबा दिला जाणार असून, त्याबाबतचे प्रथम सूचना पत्र म्हाडाकडून पाठवले जाणार आहे. त्यामुळे घराच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमारे १,०५० लॉटरी विजेत्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोकण मंडळाने २०२५मध्ये ठाणे, पालघर, नवी मुंबई, कल्याण परिसरातील सुमारे पाच हजार घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. त्यामध्ये ठाणे चितळसर येथील १,०५० घरांचा समावेश होता. या घरांपैकी १५३ घरे २०००मध्ये विजेते ठरलेल्यांसाठी राखीव ठेवली होती, तर उर्वरित सुमारे साडेनऊशे घरांसाठी लॉटरी काढली होती. त्यामध्ये विजेते ठरलेल्यांना आणि पूर्वीच्या विजेत्यांना घरांची प्रतीक्षा होती. दरम्यान, प्रकल्पातील सर्व इमारतींचे काम पूर्ण झाले असून, त्याला भोगवटा प्रमाणपत्र ठाणे महापालिकेकडून लवकरच मिळणार आहे. त्यामुळे ते मिळताच संबंधित विजेत्यांना त्याबाबतचे प्रथम सूचना पत्र पाठवून (पीओएल) पाठवले जाईल, अशी माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी दिली. दरम्यान, २०००मध्ये विजेते ठरलेल्यांच्या सदनिकांची किंमत म्हाडाने ५१ लाखांवरून ३६ लाखांपर्यंत कमी केली आहे. त्यामुळे त्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.