मुंबई

नवीन टिळक पुलाचे ७० टक्के काम पूर्ण

CD

नवीन टिळक पुलाचे ७० टक्के काम पूर्ण
२०२६ अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत
​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या दादर परिसरातील ब्रिटिशकालीन ‘टिळक पूल’ आता निरोप घेण्याच्या तयारीत आहे. त्याच्या जागी उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक आणि अधिक क्षमतेच्या नवीन उड्डाणपुलाचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या २०२६ च्या अखेरीस हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात आहे.
शंभर वर्षांहून अधिक जुना झालेला विद्यमान टिळक पूल अवजड वाहतुकीचा ताण पेलण्यास असमर्थ ठरत होता. तसेच दादर स्थानकाच्या विस्तारीकरणात जुन्या पुलाचे खांब अडथळा ठरत होते. यावर उपाय म्हणून नवीन पुलाची रचना ‘बो-स्ट्रिंग गर्डर’ पद्धतीने करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे रेल्वे रुळांच्या दरम्यान एकही खांब येणार नाही, परिणामी रेल्वे वाहतूक आणि पुलाची सुरक्षा दोन्ही अबाधित राहतील.
​जानेवारी २०२६ च्या प्रगती अहवालानुसार, प्रकल्पाने कामाचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. पुलाच्या पायाभरणीचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून, पूर्व आणि पश्चिमेकडील जमिनीवरील बहुतांश खांब उभे राहिले आहेत.
गर्डर कास्टिंगचे कामही अंतिम टप्प्यात आहे. सध्या रेल्वे रुळांवरील स्टील गर्डर्स बसवण्याचे अत्यंत तांत्रिक आणि क्लिष्ट काम सुरू असून, पुलाला जोडणाऱ्या पोच रस्त्याचे कामही प्रगतीपथावर आहे.

​दादरमधील अलोट गर्दी आणि मध्य व पश्चिम अशा दोन्ही रेल्वे मार्गांच्या वरून हे काम करायचे असल्याने प्रशासनासमोर मोठी आव्हाने आहेत. आठवड्यातून केवळ ठराविक रात्री ३ ते ४ तासांचा मेगाब्लॉक मिळतो. याच मर्यादित वेळेत काम करावे लागत असल्याने रुळांवरील कामाला जमिनीवरील कामापेक्षा अधिक वेळ लागत आहे.

कोंडी दूर होणार
​नवीन पुलावर अधिक मार्गिका असल्याने दादर टीटी ते दादर पश्चिम (प्लाझा सिनेमा) दरम्यानचा प्रवास वेगवान होईल. या प्रकल्पामुळे परिसरातील वाहतूक कोंडीत निम्म्याने घट होण्याचा अंदाज आहे. जुन्या पुलावरील मर्यादा दूर होऊन जड वाहनेही सुरक्षितपणे ये-जा करू शकतील. मे-जून २०२६ पर्यंत पुलाचे मुख्य स्ट्रक्चर उभे करण्याचे उद्दिष्ट असून, वर्षाअखेरीस हा पूल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात नवीन शासकीय विश्रामगृह; लष्कर परिसरात ४८ कक्षांची इमारत, ३३ कोटींचा खर्च, ४८ कक्ष उपलब्ध राहणार!

Nashik Municipal Corporation : नाशिकच्या महापौरपदासाठी भाजपचा 'सव्वा वर्षाचा फॉर्म्युला'! अडीच वर्षांत दोन महिलांना मिळणार संधी?

Union Budget 2026: मोठी बातमी! 15,000 शाळा व 500 कॉलेजमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब्स, गेमिंगमध्ये 10 लाख नोकऱ्यांचा मार्ग मोकळा

Nashik News : नाशिकच्या उद्योग जगतात सत्तांतर! 'आयमा'च्या अध्यक्षपदी राजेंद्र पानसरे यांचा दणदणीत विजय

मुंबई ओपन टेनिस: अंकिता रैनाची विजयी सलामी; आकांक्षा नित्तुरेवर मिळवला दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT