मुंबई

ग्रामीण भागात शेवग्याला बहर

CD

वज्रेश्वरी, ता. ५ (बातमीदार ): परिसरात काही शेतकऱ्यांनी कोरडवाहू जमिनीवर शेवग्याची शेती केली असुन या शेतीतून चांगले उत्पादन मिळू लागले आहे. शिवाय खेडोपाड्यातील अनेक कुटुंबे आपल्या परसदारी शेवगा लागवड करुन शेंगांचे उत्पादन घेत असताना दिसत आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात बेरोजगारांची संख्या वाढीस लागली आहे. शिक्षण असुनही नोकरी मिळत नसल्याने अनेक तरुण शेती व्यवसायात उतरु लागले आहेत. भाजीपाला शेती, फूलशेती, कलिंगड, खरबुज याचबरोबर आंबा, चिकु अशा फळपिकांनाही प्राधान्य दिले जात आहे.

येथील निवडक शेतकऱ्यांनी व काहींनी परसदारी शेवग्याची लागवड करुन या झाडाला येणाऱ्या शेंगांपासून हजारो रुपयांचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली आहे. गावागावातून शेंगा गोळा करून त्याची शहरातील बाजारपेठेत विक्री करणाऱ्या शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सध्या थंडीचा मौसम सुरू असुन या दिवसांमध्येच शेवग्याला चांगली मागणी असल्याने चाळीस ते पन्नास रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. शेवग्याच्या झाडाला कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत दिले जात नाही. तसेच कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी केली जात नसल्याने भाजीसाठी सध्या शेवग्याच्या शेंगांना गृहिणी अधिक पसंती देत आहेत.

----------------
औषधी गुणधर्म असलेली भाजी
शेवग्याच्या शेंगा चविष्ट व त्यांच्यामध्ये औषधी गुणधर्म असल्याने थंडीच्या दिवसात ग्रामीण भागात एका आठवड्यात चार ते पाच वेळा शेवग्याच्या शेंगांची भाजी प्रत्येक कुटुंबात केली जाते. शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. प्रोटीन, आयर्न, बीटा कॅरोटीन, ॲमीनो ॲसिड, मॅग्नेशियम असे विविध घटक असल्याने व हे घटक शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, शरिरातील अनेक समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले जात आहे.

------------
पाने, फुलांचीही भाजी
शेवग्याच्या कोवळ्या पानांची तसेच फुलांची चवदार भाजी बनवली जाते. या भाजीतसुद्धा औषधी गुणधर्म आढळून येतात. एकूणच शेवग्याच्या शेंगांसह पाने व फुलांचा उपयोग आहारात केला जातो. हॉटेलमध्ये सांबरमध्ये शेवग्याच्या शेंगांचा सर्रास वापर होत असल्याने हॉटेल व्यवसायिकांकडून या शेंगांना खुप मागणी असते.

------------
डिसेंबर ते फेब्रुवारी असे तीन महिने थंडीच्या दिवसांत शेवग्याच्या झाडास शेंगा येतात. या शेंगांमुळे आम्हाला उत्पन्नाचे साधन प्राप्त झाले आहे. शिवाय महिलांमध्ये शेवग्याच्या शेंगांना जास्त मागणी असल्याने मोठ्या प्रमाणात विक्री होते.
- माधुरी भोईर, महिला शेतकरी. वेढे पाडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT