मुंबई

गुरे चोरणारी महाराष्ट्रातील टोळी गुजरातमध्ये सक्रिय

CD

बोर्डी, ता. १५ (बातमीदार) : दक्षिण गुजरातमधील उंबरगाव तालुक्याच्या पुनाट-एकलारा भागात गुरांची चोरी करण्यासाठी आलेल्या महाराष्ट्रातील दोन संशयिताना गुजरात पोलिसांनी अटक केली. पाच संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक कामाला लागले आहे.
भिलाड पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेले पोलिस आणि अग्नीवीर हिंदू संघटना कार्यकर्त्यांच्या रात्रीच्या पेट्रोलिंगच्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार एक चारचाकी वाहन फिरत असल्याचे समजले होते. मंगळवारी (ता. १४) पहाटे साडेचारच्या सुमारास गाडीची तपासणी केली असता गुरे पकडण्यासाठी दोर व गुरांना बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन, पावाचे पॅकेट आढळून आले. तसेच गाडीला लावलेली नंबर प्लेट बनावट असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी गाडीत असलेल्या दोन संशयिताना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कत्तलखान्यात ही गुरे नेण्याचा घाट असल्याची संशयितांनी कबुली दिली. त्यांच्यासोबत आणखी पाच लोक या गुन्ह्यात सहभागी आहेत, अशी माहिती मिळाल्यामुळे पोलिसांनी इतर पाच जणांच्या विरोधात तपास सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT