मुंबई

नाळे तलावातून मत्स्यचोरी

CD

विरार, ता. १९ (बातमीदार) : सध्या महापालिका हद्दीतील वस्तूची चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता पालिकेच्या तलावातील मासेही चोरले जात असून याची पालिकेला माहितीच नसल्याचे समोर आले आहे. विरार- वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ‘ई’अंतर्गत येणाऱ्या ‘नाळे तलावा’तून मोठ्या प्रमाणात मत्स्यचोरी होत असल्याच्या तक्रारी असून, या चोरांवर पालिकेने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांची आहे.

वसई-विरार महापालिकेचे नऊही प्रभागांत एकूण १०४ तलाव आहेत. यापैकी ५९ तलाव मत्स्यसंवर्धन आणि जतन यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार होते. वसई-विरार महापालिका क्षेत्रातील मासेमारी संघटना आणि मच्छीमार संस्था यांना रोजगार उपलब्ध व्हावा, हा उद्देश या मागे होता. त्यानुसार वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ‘ई’ कार्यक्षेत्रातील आठ तलाव वसई-विरार महापालिकेच्या वतीने मत्स्यसंवर्धनाकरता ठेका पद्धतीने देण्यात येणार होते. यात डोंगरी मोडी तलाव, भोलाव तलाव, इंद्राणी वराळे तलाव, नाळे मोठा तलाव यासोबतच कोरलमान, कोरला, तळपा, खुटलई या तलावांचा समावेश होता. १ जून २०२१ ते ३१ मे २०२४ या तीन वर्षांच्या कालावधी करता हे तलाव मत्स्यसंवर्धनासाठी देण्यात येणार होते. या तलावांकरता वसई-विरार महापालिकेने २० मे २०२१ रोजी सूचना प्रसिद्ध करून निविदा मागवली होती; परंतु दिलेल्या मुदतीत एकाही ठेकेदाराने या निविदेला प्रतिसाद न दिल्याने पालिकेने फेर निविदा काढली होती. दरम्यान; वसई-विरार महापालिकेच्या ई पश्चिम कार्यक्षेत्रातील मालई तलाव, कालुंजा तलाव, गास मोठा तलाव व शिरमोळ या तलावांतील मत्स्यसंवर्धनाकरताही ई-निविदा मागवल्या होत्या. विशेष म्हणजे पालिकेने या तलावांकरता तीनदा निविदा प्रसिद्ध करूनही प्रतिसाद मिळालेला नव्हता. त्यानंतर सातत्याने पुन्हा पुन्हा निविदा काढण्याची नामुष्की पालिकेवर ओढवलेली आहे.सध्या या तलावांतून असलेले मासे चोरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. नाळे तलावात दिवसाढवळ्या अशाप्रकारच्या चोऱ्या होत असल्याच्या परिसरातील रहिवाशांच्या तक्रारी आहेत. फिरोज नामक व्यक्ती हे मासे चोरून विकत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. यात पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या संदर्भात पालिकेकडे तक्रारी केल्या असतानाही पालिका लक्ष देत नसल्याची खंत रहिवाशांनी व्यक्त केलेली आहे. या चोरांना पालिका अधिकाऱ्यांचाच अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याची शंका रहिवाशांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे याविरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांची आहे.
===============================================
तलावातून मासेचोरी होत असल्याची कल्पना नाहीड; पण तलावाच्या सुशोभीकरणाचा ठराव झालेला आहे. अधिक माहिती घेऊन कार्यवाही करण्यात येईल.
- नीता कोरे, प्रभारी सहायक आयुक्त, प्रभाग समिती-ई
***

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT