मुंबई

हस्ताक्षर स्पर्धेचा आज पारितोषिक वितरण समारंभ

CD

मुंबई, ता. १९ : मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘सकाळ’ आणि ‘देव-देश प्रतिष्ठान’ यांच्या वतीने हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून इयत्ता ३ री व ४ थी आणि इयत्ता ५ वी ते ७ वी अशा दोन गटांत पार पडलेल्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या (ता. २०) दुपारी २ वाजता दामोदर हॉल, परळ येथे आयोजित करण्यात आला आहे. या वेळी शाळानिहाय स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२३ या कालावधीत ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेले ‘रंग मराठीचे’ हे सदर विद्यार्थ्यांनी रोज वाचून, कापून वहीच्या एका पानावर चिकटवून त्यातील माहिती सुवाच्य अक्षरात वहीच्या पानावर लिहिण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले होते. विद्यार्थी व पालकांच्या मनोरंजनासाठी विविध बोधपर कार्यक्रमांचे उद्या (ता. २०) आयोजन करण्यात आले आहे. यात संदेश विद्यालय व सनराईज इंग्लिश स्कूल, पार्कसाईट या शाळांची संदेशपर गीते, नृत्य; विविध पाच राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावणारे संदेश विद्यालय, पार्कसाईट शाळेचे ‘योद्धा’ हे बालनाट्य, तसेच ‘देव-देश प्रतिष्ठान’चे आरोग्यविषयक पथनाट्य यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाला सुयशप्राप्त विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी उपस्थित राहावे, तसेच कार्यक्रमापूर्वी विजयी विद्यार्थ्यांच्या नोंदणीकरिता दुपारी दीड वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन ‘देव-देश प्रतिष्ठान’चे अध्यक्ष डॉ. वैभव देवगिरकर व ‘सकाळ’च्या वतीने करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT