मुंबई

कल्‍याण-डोंबिवलीकरांना अर्थसंकल्पाची प्रतीक्षा

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २० : गेले तीन वर्षे केडीएमसी हद्दीत प्रशासकीय राजवट लागू असून संपूर्ण कारभार प्रशासनाच्या हाती आहे. महापालिका हद्दीत विविध विकासकामे सुरू आहेत; मात्र त्यासाठी प्रशासनाकडे पुरेसा निधी नसल्याने पालिकेला शासकीय निधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरवासीयांच्‍या नजरा महापालिकेच्‍या अर्थसंकल्‍पाकडे लागल्‍या आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका अर्थसंकल्पाला मात्र अद्याप मुहूर्त मिळाला नसून, तो अजूनही प्रतीक्षेत आहे.

महापालिकांचा अर्थसंकल्प हा साधारण फेब्रुवारी महिना अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. यंदा मात्र ठाणे व कल्याण-डोंबिवली महापालिकांचा अर्थसंकल्प सादर होण्यास विलंब झाला आहे. मंगळवारी ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होत असताना कल्याण-डोंबिवलीकरांना मात्र अर्थसंकल्‍पासाठी अद्याप काही दिवस वाट पहावी लागणार आहे. केडीएमसी प्रशासनाकडून या आठवड्यात अर्थसंकल्प सादर होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, त्याविषयी ठोस अशी माहिती देण्यात कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
-----------------------------------------
निधीची अपेक्षा...
नोव्हेंबर महिन्यापासून पालिका प्रशासनाने विविध विभागातील विकास कामे, निधीची उपलब्धता याविषयी माहिती घेऊन अर्थसंकल्पाचे प्रारुप तयार केले आहे. महसुली उत्पन्न, खर्चाचा मेळ साधून फक्त अर्थसंकल्प सादर करणे प्रशासनाचे काम असताना अद्याप संकल्प सादर झालेला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कल्याण-डोंबिवली पालिकेची आर्थिक स्थिती ही ठाणे महापालिकेपेक्षा जास्त कमजोर आहे. शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकासकामे सुरू आहेत. रस्त्यांची सिमेंट काँक्रीटीकरणची कामे सुरू आहेत. शिवाय कचऱ्याची आणि वाहन कोंडीची समस्या येथे मोठ्या प्रमाणात आहे. या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने पालिका स्तरावर प्रयत्न सुरू असून त्यासाठी निधीची कमतरता आहे.

मोठमोठे प्रकल्प शहरात येऊ घातले आहेत, परंतु, अंतर्गत कामांना पालिकेकडे निधी नसल्याने सुरुवात देखील झालेली नाही. ही कामे मार्गी लावण्यासाठी शासकीय निधीची अपेक्षा केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे असल्याने व कल्याण लोकसभा मतदारसंघ हा खासदार डॉ. शिंदे यांचा असल्याने शासकीय निधी पालिकेला मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे.

-------------------------------
करवाढीचा बोजा कायम?
गेली दोन वर्षे पालिकेच्या महसुली उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यंदा मात्र उशिराने दिली गेलेली पाणी बिले आणि संगणकीकरण उन्नतीकरणाच्या नावाखाली सात ते आठ महिने पालिकेची ऑनलाईन सेवा ठप्प होती. यामुळे महसुली उत्पन्नात आवश्यक तेवढी वाढ झाली नसल्याचे बोलले जात आहे. महसुली उत्पन्नात वाढ झाली असल्याने गेले दोन वर्षे कोणताही कराचा बोजा नागरिकांवर लादण्यात आला नव्हता. यंदाही ही परिस्थिती कायम राहाते का हे पहावे लागेल.
------------------------------
कोट
चालू आठवड्यात पालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. त्‍यादृष्‍टीने प्रशासनाची तयारी सुरू आहे.
-अर्जुन अहिरे, शहर अभियंता, कल्याण-डोंबिवली महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT