मुंबई

भारतात प्रथमच नागीण रोगापासून प्रतिबंध करणारी लस उपलब्ध

CD

मुंबई, ता. २४ : ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेडने शिंग्रिक्स (झोस्टर वॅक्सिन पुनर्संयोजित, सहाय्यकारी) ही लस भारतात आणल्याची घोषणा आज केली. ५० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या प्रौढांमध्ये शिंगल्स (हर्पीस झोस्टर) म्हणजेच नागीण या विकाराच्या आणि नागीण विकारानंतर होणाऱ्या मज्जातंतूवेदनांचा प्रतिबंध करण्यासाठी ही लस उपयुक्त आहे.
शिंग्रिक्स ही जगातील पहिली नॉन-लाइव्ह, पुनर्संयोजित सबयुनिट लस असून, तिचे दोन डोस स्नायूमध्ये दिले जातात. व्हॅरिसेला झोस्टर विषाणू (व्हीझेडव्ही) पुन्हा सक्रिय झाल्यामुळे (रिअॅक्टिव्हेशन) शिंगल्स (या विकाराला नागीण असे म्हटले जाते) हा आजार होतो. याच विषाणूमुळे कांजिण्या (चिकनपॉक्स) होतात. वयाच्या ४० वर्षांनंतर ९० टक्के जणांच्या शरीरात हा विषाणू असतो आणि त्यांना शिंगल्स होऊ शकतो, असे भारतात झालेल्या एका सिरोप्रिव्हेलन्स अभ्यासात दिसून आले. शिंगल्समध्ये शरीरावर वेदनादायी पुरळ उठते. सर्व रुग्णांचे पुरळ नाहीसे होते; पण अनेकांना पुरळ नाहीसे झाल्यानंतर अनेक महिने किंवा वर्षे वेदना होतच राहतात. या वेदनांना पोस्ट-हर्पेटिक न्युराल्जिया (पीएचएन) अर्थात नागिणीनंतरच्या मज्जातंतूवेदना असे म्हणतात.

--

भारतातील ५० वर्षांहून अधिक वयाच्या २६ कोटी प्रौढांचे शिंगल्स व अन्य गुंतागुंतींपासून संरक्षण करणारी शिंग्रिक्स बाजारात आणताना जीएसकेला आनंद होत आहे. या आजारावरील सध्या अस्तित्वात असलेल्या उपचारांमुळे वेदनांपासून पूर्ण आराम मिळतोच असे नाही. लसीकरण हाच प्रतिबंधाचा एकमेव पर्याय आहे.
- भूषण अक्षीकर, व्यवस्थापकीय संचालक, ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड
----
परदेशात मान्यता
अमेरिकेतील फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने (एफडीए), शिंग्रिक्स या लशीला, ५० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये शिंगल्सचा प्रतिबंध करण्यासाठी, वापरण्यासाठी, २०१७ मध्ये मंजुरी दिली आहे. युरोपियन कमिशननेही ५० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या प्रौढांमध्ये शिंगल्सच्या प्रतिबंधासाठी शिंग्रिक्सचा वापर करण्यासाठी २०१८ मध्ये मंजुरी दिली आहे.
--
शिंगल्सविषयी
शिंगल्स हा आजार साधारणपणे छाती, पोट व चेहऱ्यावर उठणाऱ्या पुरळ तसेच वेदनादायक फोडांच्या स्वरूपात होतो. वेदनेचे वर्णन सहसा दुखणाऱ्या, जळजळणाऱ्या, भोसकल्यासारख्या किंवा झटक्यासारख्या असे केले जाते. पुरळ येऊन गेल्यानंतर व्यक्तीला पोस्ट-हर्पेटिक न्युराल्जियाचा (पीएचएन) त्रास होतो. हा त्रास पुरळ उठल्यापासून किमान तीन महिने ते अनेक वर्षांपर्यंत होऊ शकतो. पीएचएन ही शिंगल्सच्या रुग्णांमधील सर्वाधिक आढळणारी गुंतागुंत आहे. शिंगल्सच्या ५-२५ टक्के रुग्णांमध्ये ती त्यांच्या वयानुसार आढळते.
---
शिंग्रिक्सविषयी
शिंग्रिक्समध्ये एक अँटिजेन, ग्लायकोप्रोटीन ई आणि एक सहाय्यकारी प्रणाली, ए एस- ०१बी ह्यांचा संयोग साधण्यात आला आहे. वयोपरत्वे रोगप्रतिकारशक्तीत होणारी घट भरून काढण्यात मदत करेल, असा सशक्त व दीर्घकाळ टिकणारा रोगप्रतिकार निर्माण करणे हे ह्या संयोगामागील उद्दिष्ट आहे. शिंग्रिक्स ५० वर्षे व त्यावरील प्रौढांना स्नायूमध्ये दोन डोसेसद्वारे दिली जाते.
---
ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड
ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड ही ग्लॅक्सोस्मिथक्लाइन पीएलसी ह्या विज्ञानाधारित जागतिक हेल्थकेअर कंपनीची उपकंपनी आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रतिभा ह्यांना एकत्र आणून आजारांवर मात करण्याच्या उद्दिष्टाने ही कंपनी काम करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT