मुंबई

सार्वजनिक मैदानांवर उपेक्षा

CD

जुईनगर, ता. २५ (बातमीदार)ः राज्य तसेच देशपातळीवर शहराचा नावलौकिक उंचावण्यात नवी मुंबईतील खेळाडूंचे योगदान आहे. याच अनुषंगाने पालिकेने निवडक मैदानांवर फुटबॉल, मल्टिपर्पज, टर्फ, स्केटिंग रिंग, व्यायामशाळासारख्या सुविधा दिल्या आहेत; पण शहरातील ७० सार्वजनिक मैदानावर ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी स्थिती असल्याने या मैदानांचा कायापालट करण्याची विनंती नवी मुंबई मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे करण्यात येत आहे.
नवी मुंबईतील खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नवी मुंबई महापालिकेने सीबीडी येथे राजीव गांधी स्टेडिअम, नेरूळ येथील यशवंतराव चव्हाण फुटबॉल क्रीडांगण, सीबीडी व घणसोली येथे मल्टिपर्पज टर्फ, घणसोली तसेच नेरूळ येथील स्केटिंग रिंक, व्यायामशाळा अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधांसाठी पालिका अल्प प्रमाणात भाडेदेखील आकारते. त्यातून पालिकेला वर्षभरात ४४ लाख ४४ हजारांचा महसूल प्राप्त झाला आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील क्रीडांगणांना मागणी वाढत आहे; पण असे असताना नेरूळ, जुईनगर, सानपाडा शहरातील विविध भागांत ७० हून अधिक सार्वजनिक मैदाने दुर्लक्षित अवस्थेत आहेत. या मैदानाच्या देखभाल दुरुस्तीसह सार्वजनिक कार्यक्रमांसाठी वापर केला जात आहे. त्यातून नाममात्र भाडे आकारण्याचा अधिकार मनपा प्रशासनाने संबंधित आठ विभाग अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे या सार्वजनिक मैदानांवर दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्यास त्याचा फायदा नवोदितांबरोबर भाडेकरारातून मिळणाऱ्या महसुलामुळे मनपाला होणार असल्याने या मैदानांचा विकास करण्याची मागणी होत आहे.
----------------------------------------------------------
मैदानांवर मद्यपींचा वावर
शहरातील सार्वजनिक मैदानातील काही ठिकाणे मद्यपींसाठी हक्काची जागा झाली आहे. रात्र झाली की मद्यपींचे टोळके एकत्र येत मद्यपानाचा आनंद घेत असतात. अनेकदा त्यांच्यामध्ये भांडणांचे प्रकार ही झाले आहेत; तर बऱ्याच मैदानांचा ताबा प्रेमीयुगुलांनी घेतला आहे. त्यामुळे पालिकेच्या मैदानांवर विविध खेळांशी निगडित सुविधा उपलब्ध करून दिल्यास असे गैरप्रकारदेखील टळणार आहेत.
--------------------------------------------------------------
मुली तसेच महिलांना बचावासाठीचे प्रशिक्षण आम्ही २० वर्षांपासून देत आहोत. नवी मुंबई महापालिकेने अत्यल्प किमत आकारून जर जागा उपलब्ध करून दिली तर आम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळेल.
- अमित गडांकुश, सदस्य, छावा प्रतिष्ठान
-------------------------------------------------------------
कबड्डी, खो-खो, हॉकी असे खेळ खेळावे वाटतात. पण आर्थिक अडचणीमुळे आवड असलेल्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करता येत नाही. पालिकेच्या मैदानांमध्ये विविध खेळांची सुविधा उपलब्ध झाली तर सर्वसामान्यांच्या मुलींना क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घेता येईल.
- अपेक्षा औटी, विद्यार्थिनी
-----------------------------------------------------------------
नवी मुंबईतील होतकरू खेळाडूंना सुसज्ज तसेच अद्ययावत क्रीडांगणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. दर्जेदार सुविधांमुळे क्रीडागणांची मागणी वाढली आहे. त्यामुळे भविष्यात विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडांगणामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
- रेवप्पा गुरव, क्रीडा अधिकारी, नवी मुंबई महापालिका
________________________________________

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT