मुंबई

किमती मोबाईलची हॉटेलमधून चोरी

CD

नवी मुंबई (वार्ताहर) : खारघरमधील एका हॉटेलमध्ये पहाटे स्विगीची ऑर्डर घेण्यासाठी गेलेल्या एका डिलिव्हरी बॉयने हॉटेलचालकाचा १ लाख १० हजार रुपये किमतीचा आयफोन चोरल्याची घटना घडली आहे. चोरीचा हा प्रकार सीसी टीव्हीमध्ये कैद झाला असल्याने खारघर पोलिसांनी याप्रकरणी डिलिव्हरी बॉयविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
खारघर, सेक्टर-७ मधील गब्लार्स रुल्स अॅण्ड बाउल्स या हॉटेलमध्ये स्विगीमार्फत आलेली ऑर्डर घेण्यासाठी गेला होता. या वेळी चोरट्याने हॉटेलचालक प्रणव झेमसेला ऑर्डर क्रमांक सांगून पदार्थ तयार आहे का, याबाबत विचारणा केली होती. त्या वेळी झेमसे एकटेच हॉटेलच्या काऊंटरवर असल्यामुळे स्वतः किचनमध्ये गेले असता काऊंटरवर ठेवलेला १ लाख १० हजार रुपये किमतीचा आयफोन चोरला होता. काही वेळानंतर झेमसे किचनमधून बाहेर आल्यानंतर काऊंटरवर मोबाईल नसल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यामुळे झेमसे याने हॉटेलमधील सीसी टीव्हीतील चित्रणाची तपासणी केली डिलिव्हरी बॉयने त्याचा मोबाईल फोन खिशात टाकून पलायन केल्याचे आढळून आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT