मुंबई

चुकीने खात्यावर जमा झालेल्या पैशांचा अपहार

CD

नवी मुंबई, ता. २८ (वार्ताहर) : साखरखरेदीची तब्बल १० लाख ७४ हजारांची रक्कम नजरचुकीने दुसऱ्या कंपनीच्या बँक खात्यात पाठवणे एपीएमसी मार्केटमधील एका साखर व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. या व्यापाऱ्याने ज्या बँक खात्यावर पैसे पाठवले त्या कंपनीच्या प्रोप्रायटरने चुकून आलेली १० लाख ७४ हजाराची रक्कम साखरेच्या व्यापाऱ्याला परत न करता, रकमेचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. एपीएमसी पोलिसांनी या प्रकरणात रकमेचा अपहार करणाऱ्याच्या विरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
मुलुंड येथे राहणारे साखरेचे व्यापारी संजय कोठारी हे एपीएमसी मार्केटमधून साखरेचा व्यवसाय करतात. फेब्रुवारी महिन्यात कोठारी यांनी कर्नाटक बेळगाव येथील मे. गोदावरी बायोरिफायनरी लि. या कंपनीकडून साखर मागवली होती. कंपनीने कोठारी यांना मालाची १० लाख ७४ हजार रुपयांची रक्कम ॲडव्हॉन्समध्ये पाठवण्यास सांगितले होते. त्यानुसार कोठारी यांनी मालाची रक्कम कर्नाटक बेळगाव येथील मे. गोदावरी बायोरिफायनरी लि. या कंपनीच्या बँक खात्यात पाठवण्याऐवजी चुकून त्यांनी पुणे येथील गोदावरी लॉजिस्टिक कंपनीच्या बँक खात्यात पाठवून दिली. त्यामुळे कोठारी यांनी गोदावरी लॉजिस्टिक कंपनीचे प्रोप्रायटर राहुल नवीन प्रभू यांची भेट घेऊन आपली रक्कम परत देण्याची विनंती केली. त्यावर प्रभू यांनी रक्कम परत पाठवण्याचे आश्वासन दिले होते; मात्र काही कालावधीनंतर प्रभू याने वेगवेगळी कारणे सांगून उडवाउडवीची उत्तरे देऊन कोठारी यांना टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. अखेर कोठारी यांनी एपीएमसी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी राहुल प्रभूविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT