मुंबई

‘पोलिओ मुक्त’ भिवंडीसाठी महापालिकेचा पुढकार

CD

भिवंडी, ता. २९ (बातमीदार) : भिवंडी शहा पोलिओ मुक्त करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला असून पल्स पोलिओ मोहीम सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी या लसीकरण केंद्रावरील व त्यानंतर घरोघर होणाऱ्या लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन आपल्या मुलांचे लसीकरण करून घ्यावे, तसेच या राष्ट्रीय कार्यात सहभागी होऊन भिवंडी पोलिओ मुक्त करण्यास हातभार लावावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पल्स पोलिओ केंद्राचे उद्‌घाटन प्रसंगी केले.
जागतिक आरोग्य संघटनांच्या सूचनेप्रमाणे भारतातून पल्स पोलिओसारखा गंभीर आजार हद्दपार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार विविध स्थानिक संस्थांच्या स्तरांवर लसीकरणाचे कार्यक्रम घेतले जात आहे. पोलिओ मुक्त भारत अभियानांतर्गत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम प्रत्येक राज्यामध्ये राबविली जात आहे. त्याच अनुषंगाने भिवंडी पोलिओ मुक्त करण्यासाठी भिवंडी शहरामध्ये ४१९ केंद्रांवर आणि तीन दिवस घरोघरी जाऊन महापालिकेमार्फत ० ते ५ वर्षे या वयोगटातील बालकांचे पल्स पोलिओ लसीकरण केले जाणार आहे. शहरातील इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय या ठिकाणी पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्‌घाटन अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केले. यावेळी आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. बुशरा सय्यद, डॉ. वर्षा बारोट, आरोग्य विभागाचे कर्मचारी, फिल्ड ऑफिसर, नागरिक व लाभार्थी मुले आदी उपस्थित होते.

मोहिमेत समन्वय राखा
लसीकरण मोहिमेसाठी नियुक्त मनपा कर्मचारी, आशा वर्कर, विविध सामाजिक संस्था, एनजीओ, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांनी केंद्रांवरील व घरोघरी सुरु होणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेमध्ये विशेष कामगिरी करून योग्य तो समन्वय राखून काम करावे आणि आपले लसीकरणाचे टार्गेट यशस्वीपणे पूर्ण करावे, असेही अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT