मुंबई

काळानुसार वाचनाच्या साधनात बदल

CD

ठाणे, ता. ४ (बातमीदार) : आजची तरुण पिढी पुस्तक वाचत नाही, अशा तक्रारी नेहमीच येत असतात; परंतु असे नाही आजची पिढी ही छापील पुस्तकांऐवजी मोबाईल, आयपॅड, लॅपटॉप, किंडल अशा साधनांचा वापर करून पुस्तक वाचत आहेत. काळानुसार वाचनाची साधने बदलत आहेत, असे प्रतिपादन डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.
ठाण्यातील मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या १३० वा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्‌घाटनासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर आणि साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे हे उपस्थित होते. या वेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
या वेळी प्रा. डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, पुढील आव्हाने खूप अवघड आहेत, त्याला तोंड देण्यासाठी ग्रंथालयाने एक इक्विपमेंट राबवली पाहिजे. विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर आत्मसात करायचा कसा, याविषयी विचार केला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.
मला लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड होती, बहुतेक उन्हाळी सुट्टी मी ग्रंथालयात घालवायचो. जसा आपण शरीराचा व्यायाम करतो, तसा मी वाचनाचा व्यायाम करत असतो, असे माशेलकर यांनी सांगितले. आज मातृभाषा टिकवण्याचे, वाचनसंस्कृती जोपासण्याचे फार मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. मराठी भाषेतून प्रतिवर्षी सुमारे तीन हजार पुस्तके प्रकाशित होत असतात. यापैकी आपल्यापर्यंत किती येतात, आपण किती पुस्तके विकत घेतो आणि वाचतो? याचेही प्रत्येकाने चिंतन करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
.....
तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा
तंत्रज्ञान विकसित होत आहे, याचा वापर पुस्तकांसाठी केला पाहिजे, पुस्तकांवर क्यू आर कोड किंवा वाचकास डिजिटल स्वरूपात पुस्तक कसे वाचता येईल, याची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे, असेही ते या वेळी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT