Dr. Rahul Bakshi Photography esakal
मुंबई

Mumbai : मुंबईचं जीवन डॉक्टरानं मोबाईलमध्ये केलं 'क्लिक'; वैद्यकीय सेवेतून वेळ काढत बक्षींनी जपला फोटोग्राफीचा छंद

वैद्यकीय क्षेत्र म्हणजे तणावाचे, छंद जोपासायला वेळ न मिळणारे क्षेत्र म्हणून समजले जाते.

विनोद राऊत

डॉ. बक्षींचे फोटो एवढे लोकप्रिय ठरले, की २३ नोव्हेंबरपासून जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये ‘अनसीन मुंबई’ ही फोटोप्रदर्शनी सुरू होत आहे.

वैद्यकीय क्षेत्र म्हणजे तणावाचे, छंद जोपासायला वेळ न मिळणारे क्षेत्र म्हणून समजले जाते; मात्र अलिकडे डॉक्टरांच्या नव्या पिढीने हा समज बाद ठरवला आहे. मुंबईतील आघाडीचे डायबेटीक तज्‍ज्ञ असलेले डॉ. राहुल बक्षी (Dr. Rahul Bakshi) यांनी वैद्यकीय सेवेच्या धकाधकीतून वेळ काढत त्यांचा फोटोग्राफीचा छंद जपला.

त्यांचे फोटो एवढे लोकप्रिय ठरले, की २३ नोव्हेंबरपासून जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये ‘अनसीन मुंबई’ ही फोटोप्रदर्शनी सुरू होत आहे. यातील सर्वच्या सर्व ४५ छायाचित्र हे त्यांनी मोबाईलने काढलेले आहेत.

Dr. Rahul Bakshi Photography

डॉ. राहुल बक्षी हे मुंबईच्या धोबी तलाव परिसरात लहानाचे मोठे झाले. त्यांनी एमबीबीएस नाशिक; तर पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण वर्ध्यातून पूर्ण केले. वेल्लोर आणि काही ठिकाणी वैद्यकीय सेवा देत असताना त्यांची संशोधन फेलोशीपसाठी सिंगापूरला निवड झाली. ते तिथे सहा वर्षे राहिले. भारताच्या तुलनेत सिंगापूरमध्ये वैद्यकीय व्यवसाय अत्यंत प्रोफेशन आहे. तिथे डॉक्टरांवर जास्त वेळ कामाचा तणाव नसतो. त्यामुळे सकाळी ८ ते ५ पर्यंत ते वैद्यकीय सेवा संपल्यानंतर उर्वरित वेळेत राहुल यांना फोटोग्राफीचा छंद जडला.

Dr. Rahul Bakshi Photography

डॉक्टर राहुल यांनी सिंगापूरच्या ऐतिहासिक इमारती, स्थापत्यशैली तसेच तिथले रस्त्यावरच्या जीवनाचे छायाचित्रण केले. फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ती फोटो पोस्ट केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांची फोटोग्राफी बघून त्यावेळी ''टायगरएयर'' या एयरलाईन्स कंपनीने त्यांची नवी सेवा सुरू करताना १० इन्स्टाग्रामरला सोबत नेले. त्यात राहुल बक्षी होते. २०१९ मध्ये ॲपल ११ लाँच झाला तेव्हा कंपनीने जगभरातील मोजक्या छायाचित्रकारांना हा फोन वापरण्यासाठी दिला. राहुल बक्षींचा त्यामध्ये समावेश होता.

असे केले चित्रीकरण

सिंगापूरवरून २०१९ नंतर बक्षी मुंबईला आले. शहरात त्‍यांची फोटोग्राफी अधिकच बहरली. मरीन ड्राईव्हला त्यांचे राहणे होते. त्यामुळे त्यांच्या मोबाईलची लेन्स मरीन ड्राईव्ह आणि हॉर्निमन सर्कल परिसरावर फोकस होती. पावसाळ्यातील मरीन ड्राईव्ह, ताज, गेटवे आणि हॉर्निमन सर्कलचे सौंदर्य त्यांनी एवढ्या खुबीने टिपले की त्यांच्या ट्विटर अकाऊंटचे फॉलोवर्स आणि लाईक वेगाने वाढले.

Dr. Rahul Bakshi Photography

सर्व स्‍तरांतून कौतुक

मुंबईतील मैदाने, चाळी ते हेरिटेज इमारती, रस्त्यावरचे जनजीवन, मुंबईतला पाऊस, लोकल हे त्यांचे फोटो अत्यंत लोकप्रिय ठरले. ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांनीदेखील राहुल बक्षी यांना ट्विटरवर फॉलो केले आहे. २८ हजार फॉलोअर्स असणाऱ्याला ७ दशलक्ष फॉलोअर्स असलेल्या बरखा दत्त फॉलो करतात. याचा अर्थ माझ्या फोटोग्राफीत काहीतरी वेगळेपण असेल. देशातील नामवंत छायाचित्रकार अतुल कसबेकर यांनीदेखील डॉ. राहुल बक्षी यांच्या छायाचित्रांचे कौतुक केले आहे. मात्र मुंबईत अजून खूप काही करण्यासारखे आहे, याची जाणीव डॉ. बक्षी यांना आहे. मुंबईच खोताची वाडीसारखे असंख्य परिसर आहे, जे मला मोबाईलने अजून एस्प्लोर करायचे आहे, असे बक्षी सागतात.

फोटोग्राफीचा छंद जोपासत असताना कधीतरी छायाचित्र प्रदर्शनी भरवेल याची कल्पनाही मला नव्हती. आमचे कलाशिक्षक असलेले टेलोरे सर यांनी, तुझे फोटो चांगले आहे. तू याची प्रदर्शनी भरवायला पाहिजे, असे सांगितले. ते मला जहांगीर आर्ट गॅलरीला घेऊन गेले. येथूनच या पहिल्या प्रदर्शनीचा उगम झाला. याकामी इंडियन आर्ट स्टुडिओचे अनिल चढ्ढा यांनी मदत केली.

-डॉ. राहुल बक्षी, छायाचित्रकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवला शीतल तेजवानीचा जबाब

Satara Politics:'भाजपचा सातारा नगरपालिकेत महाविकास आघाडीला दणका'; आशा पंडित बिनविराेध विजयी..

Kolhapur Election: कोल्हापुरात निष्ठेला तिलांजलि, संधिसाधू राजकारणाची परंपरा जुनीच; मुश्रीफ-घाटगे युतीमुळे पुन्हा चर्चा

SCROLL FOR NEXT