Navi Mumbai
Navi Mumbai esakal
मुंबई

Navi Mumbai: नवी मुंबई महानगर पालिका पाणीटंचाईवर जलकुंभातून करणार मात

सुजित गायकवाड

ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २७ ः शहरातील पाणी पुरवठा सुरळीत व्हावे, याकरिता महापालिका पाण्याचे नियोजन करत आहे. तरी देखील पालिका क्षेत्रातील अनेक वसाहतींमध्ये नियोजनानंतरही कमी दाबाने पाणी पुरवठा होणे, पाणी अवेळी येणे तसेच वेळेआधीच पाणी बंद होणे, असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा नियोजनातील त्रृटींचा तातडीने निपटारा करण्यासाठी महापालिका शहरात तब्बल २० जलकुंभांची उभारणी करत असून वाढत्या लोकवस्तीला हा पर्याय दिलासादायक ठरणार आहे.


स्वतःच्या मालकीचे धरण असतानाही नवी मुंबई शहरात पाणी टंचाईची ओरड सुरु आहे. नवी मुंबई शहराला फक्त मोरबे धरणच नाही, तर एमआयडीसीच्या बारवी धरणातूनही पाणी पुरवठा होतो. परंतु, पाणी पुरवठ्याबाबत धोरण नसल्याने अमर्याद पाणी वापराची सवय नवी मुंबई शहराची वाढती लोकसंख्या पाहता अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने जलकुंभ तयार करण्यावर भर दिला आहे. नवी मुंबईत सर्वाधिक जास्त जलकुंभ ऐरोली विभागात तयार करण्यात येत आहेत.

त्यापाठोपाठ तुर्भे परिसरातील पाणीटंचाई सोडवण्यासाठी हनूमाननगर, इंदीरानगर आणि तुर्भे स्टोअर येथेही पालिकेने साडेसहा एमएलडीचे जलकुंभ तयार केले आहेत. तर सीबीडीमध्ये सेक्टर ९ येथे २.४ एमएलडी क्षमता असणारा जलकुंभ तयार केला जात आहे. त्याचेही ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. याचबरोबर नेरूळ येथील बालाजी टेकडीवर येथे ५.२ एमएलडी क्षमतेचा, शिरवणे येथे उच्चस्तरीय आणि भूमिगत अशा दोन्ही जलकुंभाचे काम पूर्णत्वास आले असून चाचणी सुरु आहे.

तर वाशी सेक्टर ५ येथे दोन जलकुंभ तसेच वाशी सेक्टर सेक्टर १० येथे दोन जलकुंभ तयार केले जात आहे. तर वाशी सेक्टर १५ आणि ८ येथे प्रत्येकी दोन जलकुंभ तयार करण्यासाठी निविदा प्रक्रीया सुरु आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील एेरोलीपासून कोपरखैरणे, तुर्भे, रबाळे जलकुंभ तयार केले जात आहे.

दोन योजनांमुळे हातभार
- अमृत २ या योजनेतून नवी मुंबई महापालिकेतर्फे सुरु असलेल्या पाणी पुरवठ्याच्या कामांना हातभार लागणार आहे. सध्या महापालिकेतर्फे शहरात ७८६ कोटींच्या अंदाजे तरतूद असलेली कामे प्रगतिपथावर आहेत. या खर्चापैकी ७० टक्के अनुदान राज्य व केंद्र सरकारतर्फे मिळणार आहे. उर्वरित ३० टक्के खर्च महापालिका स्वतःच्या तिजोरीतून करणार आहे.


- काही प्रकल्पांना १५ व्या वित्तआयोगात केलेल्या तरतुदीनुसार १५७ कोटी रुपये महापालिकेला मिळणार आहेत. नवी मुंबई महापालिकेला मोरबे धरणाहून शहरात पाणी आणण्यासाठी भोकरपाडा येथे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या केंद्रावर मोडकळीस आलेले जलकुंभ तोडून त्या जागेवर २.५ एमएलडी क्षमता असणारे नवीन जलकुंभ तयार केले जाणार आहे. त्यामुळे पाणी पंप करून नैसर्गिक गुरुत्वाकर्षणाने शहरापर्यंत आणण्यासाठी मदत होणार आहे.
---------------------------------
नवी मुंबई महापालिकेतर्फे शहरातील वाढती लोकवस्ती आणि नव्याने होणाऱ्या इमारती पाहता पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यात येत आहे. या अंतर्गत सध्या नव्या जलवाहिनी टाकणे, जुनी आणि जीर्ण झालेल्या वाहिन्या बदलणे, आवश्यकतेनुसार उच्चस्तरीय आणि भूस्तरीय जलकुंभ तयार करणे आणि नवीन मलनिस्सारण वाहिन्या टाकणे आदी कामे केली जात आहेत.

या कामांमध्ये बेलापूर नोडला २४ तास पाणी पुरवठा देण्याच्या प्रकल्पाचा समावेश आहे. ही सर्व कामे २०२४ जूनपर्यंत पूर्ण होऊन कार्यान्वित होणार आहेत.
-संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका
---------------------------------
ही कामे प्रगतिपथावर
- तुर्भे सेक्टर १९ बांधून पूर्ण झालेले जलकुंभ.
- हनूमान, इंदिरानगर व तुर्भे स्टोअर तयार जोडण्याबाकी आहेत.
- शिरवणे काम पूर्ण झाले.
- कोपरखैरणे पाच एमएलडी पूर्ण होऊन कार्यान्वित.
- ऐरोली समतानगर येथे चाचणी सुरु.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT