Navi Mumbai esakal
मुंबई

Navi Mumbai: महानगरपालिका लागली कामाला; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर ठेवणार कडक नजर

सकाळ डिजिटल टीम

नववर्ष स्वागतासाठी अनेकांनी हॉटेल, रिसॅार्ट, चायनीज कॉर्नर, फॉर्म हाऊस या ठिकाणी बेत आखले आहेत. या दिवशी उत्साह शिगेला पोहोचत असल्याने अनेकदा ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकले जातात. त्यामुळे नूतन वर्षाच्या स्वागत सोहळ्या ग्राहकांच्या आरोग्याची खेळणाऱ्यांवर अन्न उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असणार आहे.


वाशी रेल्वे स्थानकामध्ये शौचालयामध्ये पाणीपुरीचे सामान ठेवल्याचा प्रकार यापूर्वी घडला होता. त्याचप्रमाणे ऐरोलीमध्ये शौचालयातील पाण्याचा वापर पाणीपुरीसाठी करण्यात आला होता; तर पिण्यास अयोग्य पाणी खाद्यपदार्थांसाठी वापरण्यात येते. अशा घटना वांरवार घडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

थर्टी फस्टच्या काळातही अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे अन्न बनवण्यात येते. हॉटेलमध्ये ग्राहकांची संख्या वाढत असल्यामुळे अन्न अर्धवट शिजलेल्या अवस्थेत देण्यात येते. त्यामुळे अशा निकृष्ट अन्नविक्रेत्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती कोकण विभाग सहआयुक्त अन्न औषध प्रशासन सुरेश देशमुख यांनी दिली आहे. अन्न औषध प्रशासनाकडून दहा दिवसांपूर्वीच हॉटेल व्यावसायिकांना सूचना केल्या आहेत. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींकडून स्वच्छतेबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच कोणी नियमांचे उल्लंघन केल्यावर त्यांच्यावर कारवाई होणार आहे.

- सुरेश देशमुख, सहआयुक्त, अन्न-औषध प्रशासन कोकण विभाग

उघड्यावरचे पदार्थ खाणे चुकीचे आहे. अनेकदा या पदार्थांसाठी अशुद्ध पाणी वापरले जाते. शिवाय धुलिकणही पदार्थांवर बसतात. त्यामुळे असे पदार्थ अपायकारक ठरू शकतात.
- डॉ. प्रतीक तांबे, जनरल फिजिशअन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना देणार भेटी

तुम्हाला अतिवृष्टीची भरपाई मिळाली नाही का? शेतकऱ्यांनी ‘येथे’ तातडीने काढावा फार्मर आयडी; सोलापूर जिल्ह्यातील ४.९० लाख शेतकऱ्यांना ४९८ कोटींची भरपाई अजूनही मिळाली नाही

७ नोव्हेंबरपासून मुंबईला दररोज विमान! डिसेंबरमध्ये गोव्यालाही सोलापुरातून दररोज विमान; गृह विभागाकडून मिळेना पोलिसांचे मनुष्यबळ, पोलिस ठाण्याचाही प्रस्ताव धुळखात

SCROLL FOR NEXT