Ram Mandir sakal
मुंबई

Ram Mandir: मुंबईमध्ये झाले एक हजार आठ श्री राम मूर्तींचे वाटप

सकाळ वृत्तसेवा

Ram Mandir: अयोध्येत २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या श्री राम मंदिराचे उद्‍घाटन व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण आहे.

यानिमित्त भाजपचे नेते शुभ्रांशू दीक्षित यांनी घाटकोपर असल्फा येथील पंचरत्न गृहनिर्माण संस्थेच्या पक्ष कार्यालयात सुंदरकांड पाठाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात भाजप खासदार पूनम महाजन आणि भाजपचे मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी १०८ पंडितांना भगवान श्रीराम यांच्या १००८ मूर्तींचे वाटप करून कारसेवक आणि रामभक्तांचा गौरव केला.

सुंदरकांड पठणानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात एक हजारहून अधिक रामभक्त सहभागी झाले होते. ५०० वर्षांनंतर राम मंदिराचा अभिषेक होत असल्याने संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण असल्याचे शुभ्रांशू दीक्षित यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: मुंबईनंतर पुण्यातील कबुतर खाद्यबंदीचा वाद उच्च न्यायालयात, थेट पालिकेच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल

Amar Kale News: शरद पवारांपाठोपाठ खासदार अमर काळेंचंही खळबळजनक विधान; म्हणाले, 'निवडणूक जिंकण्यासाठी...'

Rahul Gandhi Vs Election Commission: राहुल गांधींनी केलेले 'मत चोरी'चे आरोप अन् निवडणूक आयोगाचं प्रत्युत्तर; वाचा सविस्तर!

Pune Traffic : लाडक्या बहिणी आणि भाऊ अडकले वाहतूक कोंडीत

Delivery Boy Life: रक्षाबंधनला झेप्टो, स्विगी, ब्लिंकइटने कमवले ढीगभर रुपये, पण डिलिव्हरी बॉयची कमाई किती माहितीये?

SCROLL FOR NEXT