Manoj Jarange In Mumbai: मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेल्या शिष्टमंडळामुळे पदयात्रा लोणावळ्यातच खोळंबली होती. त्यामुळे गुरुवारी दुपारी पनवेलमध्ये पोहचणाऱ्या पदयात्रेला येण्यासाठी बराच अवधी लागल्याने समन्वयकांची चांगलीच धावपळ उडाली होती, पण दुसरीकडे सकाळच्या न्याहारीचा बेत जरी फसला असला तरी जरांगे पाटील यांच्या भूमिकेला समर्थन देण्यासाठीचा पनवेलमधील मराठा समाज बांधवांचा उत्साह मात्र कायम असल्याचे दिसून आले.
लोणावळ्याहून उशिरा निघालेल्या पदयात्रेमुळे पनवेल येथे न्याहारी बनवून सकाळपासून वाट पाहत असलेल्या मराठा समाजबांधवांमध्ये काहीशे निराशेचे वातावरण होते. अशातच जरांगे पाटील यांचा मुंबईकडे येणारा मार्ग बदलण्यात आला आहे. त्यामुळे पनवेल परिसरातील मराठी समाज बांधवांचा हिरमोड झाला आहे. लाखोंच्या संख्येने सहभागी झालेल्या प्रत्येक आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी अगदी पनवेल, कामोठे, कळंबोली, करंजाडे, तळोजा, खारघर परिसरातून सायन-पनवेल महामार्ग, तसेच पळस्पे-जेएनपीटी महामार्गावर गुरुवारी (ता.२५)सकाळपासून न्याहरीसाठीचे स्टॉल लावले होते.
वर्गणी जमा करून मोर्चेकऱ्यांच्या जेवणासाठीची तयारी केली गेली होती. जवळपास पाच लाखांच्यावर फूड पॅकेट तयार करण्यात आले होते. तसेच दोन दिवसांपासून जवळपास दहा लाखांच्यावर पाण्याच्या बाटल्यांचे संकलन करण्यात आले होते, पण राज्य सरकाच्या शिष्टमंडळाकडून वाटाघाटीच्या पार्श्वभूमीवर मोर्चा पनवेलमध्ये येण्यास उशीर झाला . मात्र, काहीही झाले तरी आंदोलनात सहभागी होण्याचा उत्साह कायम आहे.
स्वागतासाठी जय्यत तयारी
आठ दिवसांपासून पनवेलमधील मराठा समाज व इतर संघटना मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण पदयात्रेचे स्वागत, खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात व्यस्त होते. कळंबोली मॅक्डोनाल्ड या ठिकाणी जरांगे-पाटील यांचे स्वागत करण्याची तयारीही मराठा समाजाने केली होती. सकल मराठा समाजाचे समन्वयक रामदास शेवाळे यांच्यामार्फत मनोज जरांगे पाटील यांना घालण्यासाठी वीस फूट लांबीचा हार तयार करण्यात आला होता. त्यासाठी पनवेल टी पॉईंट येथे क्रेनही सज्ज होती.
माथाडी कामगारांचा हिरीरीने सहभाग
तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये माथाडी काम करणाऱ्या कामगारांची टोळी क्रमांक २२४३ व ४६३ यांच्या सामाजिक बांधिलकीतून मोर्चात सहभागी असलेल्या समाज बांधवांचा थकवा दूर करण्यासाठी पळस्पे-जेएनपीटी मार्गावर पाच हजार पाण्याच्या नारळांची व्यवस्था केली होती. टोळी मुकादम किरण दिडवळ तसेच इतर माथाडी कामगार स्वतः नारळ छाटून मोर्चेकऱ्यांना पाणी देत होते.
अचानक मार्ग बदलल्याने गोंधळ
सायन-पनवेल महामार्गालगत मोर्चेकऱ्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. अनेक ठिकाणी साहित्य जमवून जेवण बनवण्याची तयारीही पूर्ण झाली होती; परंतु अचानक मार्ग बदलल्याने आता एवढ्या लोकांचे जेवण दोन ते चार किलोमीटरवर घेऊन जाण्याचा प्रश्न मराठा समाजातील समन्वयकांना पडला होता. तरीही सायन-पनवेल ते पळस्पे-जेएनपीटी मार्गावर व्यवस्थापन करण्यात आले होते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.