police transfers navi mumbai sakal
मुंबई

Police Transfers: नवी मुंबई पोलिस दलातील ६०अधिकाऱ्यांच्या झाल्या अंतर्गत बदल्या

CD

Police Transfers: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालकांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना व निर्देशानुसार आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलिस आयुक्तालयातील ६० पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत.

यात दोन सहायक पोलिस आयुक्त, २० पोलिस निरीक्षक, १८ सहायक पोलिस निरीक्षक आणि २० पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. बदली करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांची बदली करण्यात आलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी त्वरित हजर होऊन कार्यभार स्वीकारण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोर्ट विभागाचे सहायक पोलिस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली केली आहे.

तसेच त्यांच्या जागेवर सहायक पोलिस आयुक्त विशाल नेहुल यांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे न्हावाशेवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ (प्रभारी अधिकारी रबाळे पोलिस स्टेशन), वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते (प्रभारी अधिकारी न्हावा-शेवा पोलिस स्टेशन), कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप गुजर (वाहतूक शाखा), पोलिस निरीक्षक मधुकर भटे यांची (प्रभारी अधिकारी, वाशी पोलिस स्टेशन), बदली करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Varanasi Train: पुणेकरांचे काशीदर्शन झाले सोपे! आता हडपसर वरून थेट वाराणसीला 'अमृत भारत' ट्रेन, PM मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

Heart Health: वन बॉडी वन हार्ट : जीवनशैली, ताण, चयापचय आरोग्य आणि लवकर तपासणी एकत्रितपणे तुमचा हृदयाचा धोका कसा ठरवतात?

Latest Marathi News Live Update: कोल्हापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला कोर्टात केलं हजर

दहशतवादी संघटनेशी तुमचं कनेक्शन सापडंलय...NIA च्या नावाने डिजिटल अरेस्ट; वृद्धाची 9.5 लाखांची फसवणूक, कसं सुरक्षित राहायचं पाहा

Gold Rate Today: सोनं स्वस्त झालं की महागलं? दोन दिवसांतच भावात मोठा बदल; आजचा ताजा दर पाहा

SCROLL FOR NEXT