मुंबई

Panvel News: पनवेलकरांनो मनपाचा अख्खा अर्थसंकल्प जाणून घ्या एका 'क्लिक' वर

CD

Panvel News: पनवेल महापालिकेचा २०२४-२५चा अर्थसंकल्प आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (ता. २३) सादर केला. या वेळी तीन हजार ९९१ कोटी ९६ लाख रुपयांचे अर्थसंकल्प मांडण्यात आले.

त्यामध्ये तीन हजार ९९१ कोटी ६७ लाख इतका खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. म्हणजेच ३२ लाख रुपये शिलकीचे अंदाजपत्रक पनवेलकरांसाठी जाहीर करण्यात आले. यामध्ये कोणतीही कर आणि शुल्कवाढ करण्यात आली नाही.

पनवेलकरांना दिलासा देणारा खऱ्या महिला सशक्तीकरणावर भर देणारा हा ‘पिंक बजेट’ असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त हे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी नवीन आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर केला. आरंभीची शिल्लक एक हजार २५८ कोटी इतकी दाखवण्यात आली. त्याचबरोबर कराच्या रूपाने दोन हजार ४८१ कोटी वसूल होणार आहेत. त्याचबरोबर महापालिकेला थकबाकीपोटी एक हजार १६३ कोटी इतकी रक्कम वसूल होणार असल्याचा दावा पनवेल महापालिकेने अर्थसंकल्पात केला आहे.

करोत्तर महसूल व शास्ती शुल्क १९५ कोटी इतका या आर्थिक वर्षात प्राप्त होणार आहे. वस्तू व सेवा कर अनुदान ४० कोटी मिळणार आहे. मुद्रांक शुल्कातून ३० कोटी रुपये अपेक्षित आहे. झोपडपट्टी सुधारणा योजनेतून २०० कोटी रुपये अपेक्षित आहेत. त्याचबरोबर पाणीपुरवठा योजना, विविध शासकीय अनुदान आहे.

व्याजापोटी रक्कम आणि शासकीय परतावा, असे मिळून तीन हजार ९९१ कोटी ९९ लाख रुपये जमा होणार आहेत. त्यातून अनुदानातील भांडवली कामासाठी ४९३ कोटी खर्च येणार आहे. घनकचरा व्यवस्थापनावर १९५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शिक्षणावर पनवेल महापालिका १३.५६ कोटी लाख रुपये खर्च करणार आहे.

अग्निशमन दलासाठी ५७ कोटी रुपये खर्चिले जाणार आहेत. वैद्यकीय व आरोग्य सेवेसाठी ९९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पथप्रकाश व उद्यानासाठी वीस कोटी रुपये अपेक्षित आहेत. जलनिस्सारण आणि सांडपाण्यासाठी १७२.८७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

पाणीपुरवठ्यावर १४१ कोटी; तर झोपडपट्टी पुनर्वसनासाठी २०० कोटींचा खर्च केला जाणार आहे. सिडको भूखंड हस्तांतरणासाठी ८० कोटींची तरतूद महापालिकेने केली आहे. शासकीय परतावा; तसेच इतर खर्च असा एकूण तीन हजार ९९१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.(Ganesh Deshmukh, the municipal commissioner)

सर्वाधिक ३३ टक्के खर्च बांधकामावर!

पनवेल महापालिका स्थापन होऊन सात वर्षे पूर्ण झाले आहेत. महापालिका भवनासह, प्रभाग कार्यालय त्याचबरोबर इतर वास्तू उभारण्यासाठी या आर्थिक वर्षामध्ये ३३ टक्क्यांची तरतूद करण्यात आली आहे.

हा खर्च सर्वाधिक असल्याचे आयुक्तांनी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये दिसून येत आहे. अनुदानित भांडवली कामे याकरिता १२ टक्के खर्च करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासकीय परतावा व इतर विभागांकरिता अनुक्रमे दहा आणि सात टक्के खर्च अपेक्षित आहे.

झोपडपट्टी सुधारण्यासाठी पाच टक्के, पाणीपुरवठा आणि सांडपाण्याकरिता प्रत्येकी ४ टक्के पथदिवे आणि उद्यानासाठी ५ टक्के शिक्षणाकरिता तीन घनकचरा व्यवस्थापनासाठी ५ टक्के खर्च पनवेल महापालिका या आर्थिक वर्षात करणार आहे.

सिडको भूखंड हस्तांतरणासाठी २; तर अग्निशमनसाठी १ टक्का तरतूद करण्यात आली आहे. सभागृह व आस्थापनासाठी एकूण अर्थसंकल्पात ५ टक्के खर्च अपेक्षित आहे.(panvel mahanagar palika)


यंदाचे पिंक बजेट!


पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी या अर्थसंकल्पामध्ये महिला कल्याणासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद केली आहे.

त्यामुळे यंदाचे बजेट हे पिंक असल्याचे एकंदरीत दिसून आले. महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणावर पालिका प्रशासनाने विशेष भर दिला आहे.

त्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पामध्ये महिला व बालकल्याणासाठी २२५.५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

महिला सुकन्या योजना


पनवेल पालिकेमार्फत पालिका महिला सुकन्या योजना आखण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात पालिका क्षेत्रामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीच्या नावे ३० हजार रुपये राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये ठेवण्यात येणार आहेत.

महिलांसाठी विशेष तरतूद


- पंधराशे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे नियोजन
- महिलांसाठी सामाजिक सुरक्षा धोरण आखणार
- महिलांसाठी चार प्रभागात चार व्यायामशाळा, पुढे याची संख्या वाढवून दहा करण्यात येणार आहे.
- प्रत्येक प्रभागात दोन पिंक टॉयलेट बांधण्यात येतील.
- माता रमाई महिला सक्षमीकरण केंद्र बांधण्यात येईल.
- तळोजा एमआयडीसीमधील कारखान्यांचा सर्व्हे करून त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या रोजगारानुसार महिलांना प्रशिक्षण दिले जाणार
- महिलांना मोठ्या प्रमाणावर नोकरी देणाऱ्या कंपनी किंवा व्यवस्थापनाला मालमत्ता करामध्ये सवलत
- आदिवासी वाड्या, पाड्यावरील महिला व मुलींसाठी ५० लाखांची तरतूद
- महिलांना स्पर्धा परीक्षा केंद्र सोबत कोचिंग क्लासेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार
- पालिका क्षेत्रातील शिक्षणासाठी बाहेर जाणाऱ्या महिला मुलींना ५० हजार रुपये अर्थसाह्य
- पालिकेच्या चार वॉर्ड ऑफिसमध्ये योग क्लासेस व प्रशिक्षणासाठी जागा राखीव ठेवण्यात येणार त्यामध्ये योगा शिक्षक पालिकेमार्फत पुरवण्यात येणार
- जाणीव जागृतीअंतर्गत महिलांचे समुपदेशन क्लास व विधी सल्ले मोफत दिले जाणार
- काळजी व संरक्षण अंतर्गत मतिमंद बालकांना, दिव्यांग घटकातील अंतर्गत बेड रिटर्न बालकांना प्रतिमहिना तीन हजार रुपये अर्थसहाय देण्यात येणार
- महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावी म्हणून ‘पिंक ऑटो रिक्षा’ प्रत्येक प्रभागात दहा रिक्षा प्राथमिक स्वरूपात दिल्या जाणार
- क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या महिला खेळाडूंना बक्षीस योजना सुरू करण्यात येणार

अर्थसंकल्पाची वैशिष्ट्य!


- चालू आर्थिक वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा दरवाढ नाही
- वृद्धांसाठी अत्याधुनिक विरंगुळा केंद्र बांधण्यात येणार
- ज्येष्ठ नागरिकांना ‘एनएमएमटी’मधून मोफत प्रवास
- पालिका क्षेत्रामध्ये खासगी शिक्षण संस्थांच्या धर्तीवर कामोठे आणि तळोजा या ठिकाणी अत्याधुनिक शाळा बांधण्यात येणार
- जिल्हा परिषदेच्या पालिका क्षेत्रामध्ये समाविष्ट झालेल्या शाळांचे ज्या शाळा सुस्थितीत आहे, त्याचे नूतनीकरण व ज्या सुस्थितीत नाहीत त्या शाळा नव्याने बांधण्यात येणार

पनवेल पालिका क्षेत्रातीत आरोग्य बळकटीची फलश्रुती झाल्यानंतर, या वर्षीचा अर्थसंकल्प अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या पंचसूत्रीवर आधारित सादर करण्यात आला आहे. खऱ्या अर्थाने हे ‘पिंक बजेट’ आहे. ‘एक पाऊल महिला सशक्तीकरणाचे धोरण’ पालिकेने स्वीकारले आहे. सर्व सामान्य नागरिकांसाठी यंदा कुठल्याही प्रकारचे करदर वाढ, शुल्कवाढ नसलेले शिलकीचे बजेट सादर करण्यात आले आहे.

- गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल पालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha election 2024 Results : भारतातल्या लोकसभा निकालावर चीनची प्रतिक्रिया; ''जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर...''

Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

Lucknow Robbery : चोरी करायला गेला अन्..एसीत झोपला ; लखनऊच्या चोराचा पराक्रम पाहिलात काय?

Crime News: मुंबईच्या IAS आधिकाऱ्याच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; कारण अस्पष्ट

Iran: इराणमध्ये अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार रिंगणात, पण निवडणुकीआधीच होणार पराभव? कारण काय?

SCROLL FOR NEXT