kokan politics  sakal
मुंबई

Kokan News: ''संविधान, लोकशाही वाचवण्यासाठी भाजपला सत्तेतून हटवले पाहिजे''

भारत जोडो अभियानाच्या राज्य समन्वयक उल्का महाजन यांचे आवाहन। Appeal by Ulka Mahajan, State Coordinator of Bharat Jodo Abhiyan

सकाळ वृत्तसेवा

Kokan News: देशात कित्येक वर्षांपूर्वी आणीबाणी जाहीर झाली होती. त्या काळात बाबा आमटे यांनी ‘भारत जोडो’ यात्रा काढली होती. भारत जोडो अभियान हा संदेश आपल्या सर्वांसाठी आहे. ही लढाई कोण्या एका पक्षाची नसून जनतेची आहे.

संविधान, लोकशाही वाचवण्यासाठी भाजपला सत्तेतून हटवले पाहिजे. यासाठी ‘भारत जोडो’ अभियानात सर्वांनी सहभागी व्हा, असे आवाहन भारत जोडो अभियानाच्या राज्य समन्वयक उल्का महाजन यांनी केले.

रोह्यातील सार्वजनिक भाटे वाचनालय येथे नुकतीच भारत जोडो अभियान आणि इंडिया अलायन्समधील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक पार पडली. यात त्या बोलत होते.

उल्का महाजन म्हणाल्या की, भाजपचे राजकीय मनसुबे खूप घातक आहेत. त्यांना जाती-जाती, धर्मा-धर्मामध्ये तेढ निर्माण करुन सत्ता उपभोगायची आहे. संविधान बनवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले होते; पण भाजपला संविधान काढून मनुस्मृतीचे राज्य पुन्हा आणायचे आहे.

ईव्हीएमबाबत बोलताना महाजन म्हणाल्या की, ईव्हीएमसंदर्भात तज्ज्ञांची टीम चौकशी करत आहे. ईव्हीएमला आमचा विरोध कायम सुरूच आहे. याबाबत काही प्रकरणे कोर्टातसुद्धा सुरू आहेत. जनतेने ईव्हीएम घोटाळ्यासंदर्भात विचार न करता भरघोस मतदान करावे.

त्या पुढे म्हणाल्या की, भाजप मनुस्मृती मानणारा आणि जुन्या रुढींकडे नेणारा पक्ष आहे; तर दुसरीकडे भांडवलदारांबरोबर हातमिळवणी करून हा देश विकायला निघाले आहेत. आता सरकार संविधाननुसार काम करते की नाही, ते तपासण्याची जबाबदरी नागरिकांची आहे.

केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या सरकार संविधान मानायला तयार नाहीत. अशा वेळी राजकीय पक्षाची जबाबदारी तर आहेच; पण आम्ही सर्वसामान्य नागरिकांनी सरकारवर अंकुश ठेवून संविधान पाळलेच पाहिजे.

या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख समीर शेडगे, काँग्रेस तालुका अध्यक्ष सुनील देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष देविदास जाधव, उपतालुकाप्रमुख महादेव साळवी, संतोष खेरटकर, राजेश काफरे, शिवराम महाबळे, बिलाल कुरेशी, असिफ मुल्ला, इक्बाल पानसरे, सगीर अधिकारी, नीलेश वारंगे, सोपान सुतार, उमेश ढुमणे, रघुनाथ नाईक, जगदीश मोरे तसेच पेण व श्रीवर्धन मतदारसंघातील काँग्रेस, शेकाप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) व भारत जोडो अभियानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

Shirur Crime : पुणे–अहिल्यानगर महामार्गावर थरार; शिरूरजवळ तरुणावर कोयता-तलवारीने जीवघेणा हल्ला!

Shirur Extortion : “माझ्या एरियात काम करायचे असेल तर दोन लाख द्या”; शिरूरमध्ये कंत्राटदाराला धमकी देणारा तडीपार गुंड अटकेत!

IPL 2026 Auction live : Unsold खेळाडूसाठी काव्या मारनने मोजले १३ कोटी; सर्फराज खान CSKच्या संघात, पृथ्वी शॉ सर्वांना 'नकोसा'

Latest Marathi News Update : देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

SCROLL FOR NEXT