vande bharat  esakal
मुंबई

Railway News: आता वंदे भारतचा वेग चांगलाच वाढणार; जाणून घ्या काय असणार नवा स्पीड

सकाळ वृत्तसेवा

Railway News: भारतीय रेल्वे ‘वंदे भारत’ ट्रेनसह मेल-एक्स्प्रेसची गती वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. ‘मिशन रफ्तार’ अंतर्गत रेल्वे मार्गिकेचे अद्यावतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

त्यानुसार मुंबई ते अहमदाबाद रेल्वे मार्ग अद्यावतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच देशातील पहिली ‘वंदे भारत’ ट्रेन ताशी १६० किमी धावणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

केंद्र सरकारकडून देशातील अनेक शहरांदरम्यान ‘वंदे भारत’ रेल्वे सुरू करण्यात आली आहे. या एक्स्प्रेसला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून याची लोकप्रियता वाढत आहे. सध्या देशभरात २० पेक्षा जास्त मार्गांवर ‘वंदे भारत’ ट्रेन धावत आहे.


‘वंदे भारत’ची ताशी तब्बल १८० किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता आहे. मात्र या वेगानुसार, रेल्वे मार्गाची क्षमता नसल्याने ही एक्स्प्रेस ताशी ११० ते १३० वेगाने धावत आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेने ‘वंदे भारत’ ट्रेनसह मेल-एक्स्प्रेस, सुपरफास्ट आणि मालवाहतूक रेल्वेगाड्या यांचा वेग दुप्पट करणे आणि सरासरी वेगात २५ किमी प्रति तासाने वाढ करण्यासाठी ‘मिशन रफ्तार’ची आखणी केली आहे. यासाठी मुंबई-दिल्ली १,३७९.१४ किमीचा मार्ग निवडण्यात आला आहे.

दहा हजार कोटींचा खर्च अपेक्षित


‘मिशन रफ्तार’साठी अंदाजे १० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या योजनेमुळे वंदे भारत, तेजस आणि शताब्दी एक्स्प्रेससारख्या रेल्वेगाड्यांचा वेगही वाढणार आहे.

आगामी निवडणुकांपूर्वी मार्च २०२४ च्या आधी पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल-गांधीनगर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस ताशी १६० किमी वेगाने धावणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली.

काम अंतिम टप्प्यात


‘मिशन रफ्तार’ अंतर्गत मुंबई-सुरत-वडोदरा-दिल्ली, त्याचबरोबर मुंबई-वडोदरा- अहमदाबाद या महत्त्वाच्या मार्गांचे अद्यावतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यापैकी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील काम अंतिम टप्प्यात आले आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून पाहणी अहवाल मिळाल्यानंतर या मार्गावरून ताशी १६० किमी वेगाने रेल्वेगाड्या धावणार आहेत.

अर्ध्या तासाची होणार बचत


‘वंदे भारत’ने मुंबई-अहमदाबाद दरम्यानचे अंतर ५ तास १५ मिनिटांत पूर्ण होते. या मार्गावर सध्या १३० किमी प्रतितास या वेगाने धावतात. १६० किमी प्रतितास वेगाने ‘वंदे भारत’ ट्रेन धावल्यावर प्रवासात ३० मिनिटांची बचत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

SCROLL FOR NEXT