Mumbai Mega Block
Mumbai Mega Block sakal
मुंबई

Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या; कल्याण-कसारा दरम्यान आज पॉवर-ब्लॉक!

सकाळ वृत्तसेवा

Railway News: मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा स्थानकांदरम्यान विविध पायाभूत सुविधांच्या कामासाठी आज शनिवारी (ता. २) रात्री वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याण ते कसारादरम्यान अनेक लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.(mumbai Local News)

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉकदरम्यान खडवली ते वासिंद, आसनगाव ते आटगाव आणि शहाड ते आंबिवली स्थानकांदरम्यान पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री १२.४५ ते रविवारी पहाटे ५.१५ वाजेपर्यंत पुलाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटीहून रात्री १२.१५ वाजता सुटणारी कसारा लोकल ठाणे स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार आहे, तर कसारा स्थानकातून पहाटे ३.५१ वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल ठाणे स्थानकातून धावणार आहे.

याशिवाय मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीत बदल केला आहे. ट्रेन क्रमांक १२१०६ गोंदिया-सीएसएमटी विदर्भ एक्स्प्रेस गोदिंया स्थानकातून दोन तास उशिरा निघणार आहे. ट्रेन क्रमांक १२१४१ एलटीटी-पाटलीपुत्र एक्स्प्रेस पहाटे ३.४५ वाजता, ट्रेन क्रमांक ११०५७ सीएसएमटी-अमृतसर एक्स्प्रेस पहाटे ३.५५ वाजता,(Railway Trains Are Late)

ट्रेन क्रमांक १२८११ एलटीटी-हटिया एक्स्प्रेस पहाटे ४.१० वाजता, ट्रेन क्रमांक २२१७७ सीएसएमटी-वाराणसी महानगरी एक्स्प्रेस पहाटे ४.२० वाजता, ट्रेन क्रमांक २२५३८ एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस पहाटे ४.३५ वाजता चालविण्यात येणार आहे.

ब्लॉकमुळे मुंबईकडे येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांना खर्डी, आटगाव, कसारा, इगतपुरी आणि भुसावळ स्थानकात थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे शालिमार-एलटीटी एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस, गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस, आदिलाबाद- सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेस, अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस, सिंकदराबाद-सीएसएमटी देवगिरी एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस, फिरोजपूर-सीएसएमटी- पंजाब मेल आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने मुंबईत पोहचणार आहे.(mumbai railway news)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT