Express Way traffice mumbai pune kalamboli accident  sakal
मुंबई

Express Way Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बारा तासांत दोघांचा मृत्यू

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे ओलांडताना कारने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Pune Express Way: पनवेलमध्ये मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे तसेच तळोजा येथे गेल्या बारा तासांत घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला आहे.

यातील एका अपघातात पोकलॅन ऑपरेटरचा डंपरच्या चाकाखाली आल्याने मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या अपघातात मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे ओलांडताना कारने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

तळोजा येथे शुक्रवारी (ता. ८) पहाटे झालेल्या अपघातात पोकलॅन ऑपरेटर रणजितकुमार जिवाधन महतो (२६) याचा मृत्यू झाला. रणजितकुमार हा उलवेतील एका लेबर कॅम्पमध्ये लहान भावासह राहात होता.

तळोजा नावडे फेज-२ मध्ये एका विकसकाच्या बांधकाम साईटवर पहाटे चार वाजता कामावरून घरी परतत असताना रणजितकुमार पाय घसरून पडला होता. याचवेळी जाणाऱ्या एका डंपरच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून चालक फरार आहे.

तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेलमधील आदई गावाजवळ गुरुवारी (ता. ७) रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या दुसऱ्या अपघातात आदई गावाजवळ कातकरी वाडीत राहणारे दत्ता वाघे (४५) यांचा पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने धडक दिल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी खांदेश्वर पोलिस ठाण्यात मृत दत्ता वाघेविरोधात गुन्हा दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Petrol Pump: पुण्यात सातनंतर पेट्रोलपंप सुरु राहणार का? संध्याकाळी काय निघाला तोडगा?

Pachod Crime : पाच लाखासाठी मुकादमाकडून ऊसतोड कामगाराचे अपहरण; पाचोड येथे गुन्हा

Pregnant Woman and Traffic Police Viral Video : भररस्त्यात प्रेग्नंट महिला ओरडत होती, पण तरीही वाहतूक पोलिस स्कूटी चालवतच राहिला, नक्की काय घडलं?

Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update: सांगरूळ बंधाऱ्यामध्ये कुंभी नदीपात्रात कोंबड्यांचे वेस्टेज

SCROLL FOR NEXT