Crime sakal
मुंबई

Mumbai News: चिमुकल्यांना बांधून ठेवत लाकडीपट्टीने मारहाण; पाळणाघरातील धक्कादायक प्रकार

डोंबिवली पोलिस ठाण्यात पाळणाघर चालवणाऱ्या गणेश प्रभुणे, आरती प्रभुणे या दाम्पत्यासह राधा नाखरे या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे|A case has been registered against Ganesh Prabhune, Aarti Prabhune, a couple who run a nursery in Dombivli police station along with Radha Nakhre.

सकाळ वृत्तसेवा


Domblivali Crime News: पाळणाघरात बालकांचा सांभाळ करणारे कर्मचारी, सेंटरचालक मुलांना मारहाण व संतापजनक वागणूक देत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

या सेंटरमधील व्हिडिओ व पालकांच्या तक्रारीवरून डोंबिवली पोलिस ठाण्यात पाळणाघर चालवणाऱ्या गणेश प्रभुणे, आरती प्रभुणे या दाम्पत्यासह राधा नाखरे या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली पूर्वेस राहणारे मंदार उगले व त्यांची पत्नी हे दोघे कामावर जात असल्याने ते त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीला फडके रोड येथील हॅपी किड्स डे केअर या पाळणाघरात ठेवतात. या पाळणाघरात गणेश प्रभुणे त्यांची पत्नी आरती प्रभुणे व राधा नखरे हे तिघे लहान मुलांचा सांभाळ करतात.

प्रभुणे दाम्पत्य व राधा नाखरे यांच्याकडून लहान मुलांना बांधून ठेवले जात होते. त्याला मारहाण केली जात होती, त्यांना मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. याचदरम्यान या पाळणाघरात साधना सामंत ही महिलादेखील काम करण्यास गेली.(A woman Sadhana Samant also went to work in this nursery)

तिने हा सगळा धक्कादायक प्रकार पाहिला. या प्रकारचा सामंत यांनी व्हिडिओ काढत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी कविता गावंड यांना दिला. कविता यांनी संबंधित पालकांना फोन करून सगळ्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी गावंड यांच्यासहित रामनगर पोलिस ठाणे गाठले.

याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांनी तत्काळ तक्रार दाखल करून घेण्याचा सूचना संबंधितांना दिल्या. त्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय

MI vs RR: आधी आऊट, मग नो बॉल अन् चौकार... जडेजाने शार्दुल ठाकूरची भर मैदानात उडवली खिल्ली! Video होतोय Viral

विधानपरिषदेआधी काँग्रेसला धक्का? ७० नगरसेवक नॉट रिचेबल; राज्यात खळबळ

Jio New Recharge : जिओची धमाकेदार ऑफर! 'या' रिचार्जमध्ये मिळणार Netflix-Amazon सारखे 15 OTT ॲप्स; तसेच 5GB डेटासुद्धा

World Thyroid Day 2026: अचानक शरीरात बदल जाणवत आहेत? थायरॉईडमुळे होणाऱ्या समस्या आणि त्यावरील सोपे उपचार समजून घ्या

SCROLL FOR NEXT