Death esakal
मुंबई

Mumbai News: पाळीचा त्रास असह्य झाल्याने मुलीने उचलले टोकाचे पाऊल!

Mumbai News: मुलीला पहिल्यांदाच मासिक पाळी आली होती. तिला त्याचा त्रास होत होता |The girl had her period for the first time. She was suffering from it

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: पहिल्या मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने किशोरवयीन मुलीने कथितरीत्या आत्महत्या करून जीवन संपवल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आहे. मंगळवारी (ता. २६) संध्याकाळी मालाडच्या मालवणी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

मालाडच्या मालवणी परिसरात राहत असलेल्या या १४ वर्षीय मुलीने मंगळवारी गळफास घेत जीवन संपवले. कुटुंबीयांना याची माहिती होताच त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. पोलिसांनी मृत मुलीच्या पालकांची चौकशी केली असता त्यांनी कुणाहीविरोधात तक्रार दाखल केली नाही.

मुलीला पहिल्यांदाच मासिक पाळी आली होती. तिला त्याचा त्रास होत होता. हा त्रास सहन न झाल्याने मुलीने हे पाऊल उचलल्याचा निष्कर्ष पोलिसांनी पालकांचा जबाब नोंदवल्यानंतर काढला. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह पालकांच्या स्वाधीन करण्यात आला. दरम्यान, अशाप्रकारची ही पहिलीच घटना असल्याने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडूनही आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT