Eknath Shinde esakal
मुंबई

Eknath Shinde: ठाण्याची उमेदवारी स्वपक्षीयालाच द्या; शिंदेंचे पदाधिकारी आक्रमक!

सकाळ वृत्तसेवा

Thane News: लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यातच महायुती आणि महाविकास आघाडीत आजही जागा वाटपावरून एकमत होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाणे आणि कल्याण लोकसभेवरूनदेखील शिवसेना भाजपत रस्सीखेच सुरू आहे

अशातच ठाणे लोकसभेवर शिवसेनेकडून दावा करण्यात येत आहे. त्यानुसार शिवसेनेने शिंदे गटाकडून विभागावर बैठका घेण्यात येत आहे. त्यात शनिवारी टेंभीनाका येथील आनंदाश्रमात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची शनिवारी सायंकाळी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे.

या बैठकीत ठाणे लोकसभेवर दावा करीत, स्वपक्षीयालाच उमेदवारी मिळावी, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून महाविकास आघाडी आणि महायुतीकडून अनेक उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. असे असले तरी दुसरीकडे अनेक जागांवरून मतभेद सुरू असून जास्‍तीत जास्त जागा आपल्या पदरात पडाव्यात, यासाठी दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ठाणे लोकसभेसाठी राजन विचारे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यातच शिंदे सेनेकडून आणि भाजपकडून अनेकांची नावे यासाठी पुढे येत आहेत. भाजपकडून हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. मात्र शिंदे सेना देखील हा मतदारसंघ सोडण्याच्या तयारीत नसल्याचे चित्र आहे.

शिवसेनेतील उठावानंतर राजकीय समीकरणे बदलली असली तरी ही जागा शिवसेनेलाच मिळावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आग्रही आहेत. असे असतानाच, भाजपचे नवी मुंबईतील नेते गणेश नाईक अथवा त्यांचे माजी खासदार पुत्र संजीव यांच्यासाठी भाजपने या जागेवर दावा केला आहे. तसेच ही जागा मुख्यमंत्र्यांना सोडावी लागली तरी दोघांच्या सहमतीचा उमेदवार म्हणून संजीव नाईक यांनी धनुष्यबाण चिन्हावर ही निवडणूक लढवावी, असा प्रस्तावही भाजपने मुख्यमंत्र्यांपुढे ठेवल्याची माहिती पुढे आली आहे.

शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील संजीव नाईक यांच्याशी हातमिळवणी करीत याबाबत संकेत दिल्याची चर्चा आहे; परंतु या चर्चेमुळे ठाणे, नवी मुंबईतील मुख्यमंत्री समर्थक अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांनी स्वपक्षातीलच पदाधिकाऱ्याला हे तिकीट दिले जावे, अशी भूमिका मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मांडल्याचीही चर्चा आहे.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी बैठकांचा सपाटा घेण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी सायंकाळी आनंद आश्रमात बैठक घेण्यात आली. या बैठकीला शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्यासह माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख असे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

ठाणे लोकसभेची जागा शिवसेनेचीच असून आताही महायुतीच्या जागावाटपात ती शिवसेनेलाच मिळेल. त्यामुळे निवडणुकीच्या कामाला लागा, अशा सूचना पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थितांना दिल्याची माहिती शिंदे सेनेतील सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT