मुंबई

MNS News: राज ठाकरे आधुनिक युगातील कर्ण; त्यांनी हिंदुत्वाची शाल पांघरून मदत मागणाऱ्यांना मदत केली

सकाळ वृत्तसेवा

Thane News: महायुतीचा प्रचार करायचा की नाही, याबाबतचा निर्णय राज ठाकरे घेणार आहेत. तसेच आम्हाला सन्मानपूर्वक बोलवले तर आम्ही जाऊच, असे वक्तव्य मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केले आहे. या वेळी राज ठाकरे यांना आधुनिक युगातील कर्णाची उपमा देत राजीनामा दिलेले कार्यकर्ते हे तितके प्रभावी नसल्याचे त्यांनी सांगितले.

गुरुवारी ठाण्यात आलेल्या प्रकाश महाजन यांनी राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी राज ठाकरे आधुनिक युगातील कर्ण आहेत. त्यांनी आधुनिक हिंदुत्वाची शाल पांघरून मदत मागणाऱ्यांना मदत केली आहे. त्यांना माहिती होते की, आपल्यावर टीका होणार आणि टीका करणारे कोण आहे, हेही त्यांना माहिती होते.

तसेच यापूर्वी राज ठाकरे यांना महत्त्व नव्हते, त्यामुळे आता ते कुठेही गेले, याची चिंता कशाला करता, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. हिंदुत्वाचा विचार करून हा पाठिंबा दिला आहे. हे धर्मयुद्ध आहे. राज ठाकरे श्रीकृष्णाच्या भूमिकेत आहेत. श्रीकृष्णाचा पाठिंबा घेण्यासाठी कोण कोण गेले होते आणि कुणाला पाठिंबा दिला, धर्मनीतीला लक्षात घेऊन हा पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका


राज ठाकरे यांनी हिंदुत्व आणि देशाची प्रगती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. हिंदुत्वाशी राज ठाकरे यांची नाळ जोडली गेली आहे. त्याचबरोबर भारत बलशाली देश असून अर्थव्यवस्थेत देश पुढे आहे. काही लोकांनी शाल पांघरून फक्त हिंदुत्वाचे ढोंग घेतल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली.


अजित पवार यांच्यातही बदल


आमची नाळ हिंदुत्वाशी जुळलेली आहे. ही भूमिका देशहित डोळ्यासमोर ठेऊन घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाला धरून आहेत; पण अजित पवार यांच्यातही बदल झालेला आहे. म्हणून त्यांनी पाठिंबा दिलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

Rajya Sabha Election: विदर्भातून राज्यसभेवर कोण जाणार? भाजपच्या तंबूत तीव्र लॉबिंग सुरू, 'या' तीन बड्या नेत्यांची नावे चर्चेत

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

Latest Marathi News Live Update : अक्षता टाकण्यापूर्वीच वरपित्याचा मृत्यू..!

Thane News: वालधुनी नदीवर घाट उभारणीस अडथळा, ३० घरांना नोटीसा; दोन दिवसांत घरे रिकामी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT