Vasai fort rode sakal
मुंबई

Vasai: वसईकरांनो लक्ष द्या, बिबट्याच्या भितीने 'हा' प्रमुख रस्ता सायंकाळी राहणार बंद

किल्ल्याकडे जाणारा रस्ता सांयकाळी काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे |

CD

Vasai News: वसई किल्ल्यात बिबट्या दिसल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे प्रशासन आणि वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी वसई किल्ल्यातील रस्ता सायंकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

वसईच्या किल्ल्यात राहणाऱ्या रहिवाशांना दोन आठवड्यांपूर्वी बिबट्याचे दर्शन झाले होते. याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर या परिसरात पिंजरे लावून बिबट्यांचा मागोवा घेण्यात येत आहे; पण बिबट्याला पकडण्यात यश आले नसल्याने रहिवाशांनी शुक्रवारी (ता. १२) वसईचे प्रांताधिकारी यांची भेट घेतली होती.

या बैठकीला वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. या वेळी वनविभागाने बिबट्याला पकडण्यात येणाऱ्या अडचणी मांडल्या. तसेच किल्ल्यातील लोकांच्या असलेल्या सततच्या वावरामुळे लावलेल्या पिंजऱ्याकडे बिबट्या फिरकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे किल्ल्याकडे जाणारा रस्ता सांयकाळी काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT