मुंबई

Accident News: दुर्दैवी घटना; हळदीला जाणाऱ्या सख्या भावांचा अपघातात मृत्यू!

भरत पाटील यांच्या फिर्यादीवरून चालक राकेश कंबोज (अंबाडी) याला अटक केली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक खिरड करत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Vajreshvari News : दिघाशी येथे नातेवाइकांच्या हळदी समारंभासाठी जात असताना मौजे चिंचवळी (खांडपे) गावातील गुरुनाथ लक्ष्मण पाटील (४८) आणि पंढरीनाथ लक्ष्मण पाटील (५८) या सख्ख्या भावांचा साईगाव (वारेट) येथे अपघाती मृत्यू झाला. बुधवारी (ता. १७) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.(thane Accident News)

भिवंडी वाडा महामार्गावरील दुगाड फाटा येथे एमएच ०४ केव्ही १७४६ क्रमांकाच्या चारचाकीने दुचाकीवरून पत्नीसोबत जाणाऱ्या भरत पाटील (पारीवली) यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक मारली. यात दुचाकीवरील भरत पाटील व त्यांची पत्नी जखमी झाल्या.(bhiwandi Accidnet News)

या अपघातानंतर चारचाकी चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवत साईगाव नदीजवळ दुचाकीवरून जाणाऱ्या गुरुनाथ पाटील व पंढरीनाथ पाटील यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोघा पाटील बंधूचा मृत्यू झाला.

उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल झालटे, गणेशपुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी घटनास्थळी भेट दिली. भरत पाटील यांच्या फिर्यादीवरून चालक राकेश कंबोज (अंबाडी) याला अटक केली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक खिरड करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT