Navi Mumbai Crime:  sakal
मुंबई

Navi Mumbai Crime: बेकायदेशीर वास्तव्य; १२ परदेशी नागरिकांची धरपकड, मूळ देशात पाठविण्याची कार्यवाही सुरू

CD

Mumbai News: खारघर पोलिसांनी शुक्रवारी (ता. १९) रात्री केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान खारघर परिसरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या १२ परदेशी नागरिकांची धरपकड केली.

यात १० आफ्रिकन महिला तसेच २ बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. हे सर्व परदेशी नागरिक काही वर्षांपासून नवी मुंबईत बेकायदा वास्तव्यास असल्याचे त्यांच्या चौकशीत आढळून आले आहे. पोलिसांनी सर्वांना अटक करून त्यांना त्यांच्या मूळ देशात पाठविण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान खारघर सेक्टर-२७ मधील रांजणपाडा भागातील मेट्रो रेसीडेन्सी या इमारतीत काही नायजेरियन नागरिक बेकायदा राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास छापा मारला असता, फ्लॅटमध्ये १० आफ्रिकन महिला आढळून आल्या.

त्यांच्याकडे भारतातील वास्तव्याबाबतचे कागदपत्रे, तसेच पासपोर्ट, व्हिजा नसल्याचे आढळून आले. तसेच त्यांनी युगांडा देशाचे नागरिक असल्याची कबुली दिली. तसेच सेक्टर-१८ मध्ये बालाजी स्वीटसमोर काजल मुख्तार शेख (३६) व नूर इस्लाम लतीफ शेख (४२) हे दोघे संशयास्पदरीत्या आढळून आले.

पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडे भारतातील वास्तव्याबाबतचे तसेच पासपोर्ट व व्हिसा आदी कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. त्यांनी बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी १२ जणांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT