मुंबई

Navi Mumbai News: या कारणावरुन मेट्रो स्थानकावर प्रवासी होत आहेत हैराण

महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, सर्व स्थानकावरील मेट्रो वाहनांची वेळ आणि प्रवासी वर्गाच्‍या मागणीची दखल घेऊन पाहणी करून योग्य ती उपाययोजना केली जाईल

CD


Kharghar News: वाढत्या उन्हाच्या झळांनी प्रवासी घामाघूम होत असताना, नवी मुंबई मेट्रो स्थानकात पंखे नसल्यामुळे नाराजी व्‍यक्‍त करण्यात येत आहे. सिडको आणि महामेट्रोने स्थानकावर पंखे बसवावे, अशी मागणी प्रवासीवर्गांकडून केली जात आहे. (navi mumbai metro)


सिडकोच्या अनेक प्रकल्पांपैकी खारघर ते तळोजा परिसरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी नवी मुंबई मेट्रो प्रकल्प काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आला. अकरा किलोमीटर मार्गावरील बेलापूर ते पेंधरदरम्यान अकरा स्थानके उभारली आहेत. (navi mumbai sidco latest news)

तसेच मेट्रोने दैनंदिन बारा ते पंधरा हजार प्रवासी प्रवास करतात. सिडकोने सुशोभित असे मेट्रो स्थानक उभारले आहे. मात्र, मेट्रो स्थानकांवर पंखे बसविले नसल्‍याने गरमीमुळे प्रवासी हैराण होत आहेत. सध्या उकाडा वाढत असून पारा चाळिशी पार जात आहे.

अशामध्ये मेट्रो स्‍थानकामध्ये पंखे नसल्‍याने प्रवाशांच्‍या अंगातून घामाच्‍या धारा वाहत आहेत. एकीकडे मेट्रोचे तिकीट दर जास्‍त असून मूलभूत सोयी-सुविधादेखील मिळत नसल्‍याने रोष व्यक्‍त करण्यात येत आहे. त्‍यामुळे मेट्रो प्रशासनाने लवकरात लवकर पंख्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रवासीवर्गाकडून करण्यात येत आहे.(navi mumbai metro marathi news)

यासंदर्भात महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, सर्व स्थानकावरील मेट्रो वाहनांची वेळ आणि प्रवासी वर्गाच्‍या मागणीची दखल घेऊन पाहणी करून योग्य ती उपाययोजना केली जाईल, असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT