Mini BKC In Wadala

 

ESakal

मुंबई

MMRDA: वडाळ्याचा होणार कायापालट; मिनी बीकेसी उभारणार; एमएमआरडीएचा नवा प्लॅन

Mini BKC In Wadala: वडाळा ट्रक टर्मिनलची जागा आणि लगतच्या भूखंडावर मिनी बीकेसी उभे राहणार आहे. येथील भूखंडाचा लिलाव केला जाणार असून त्याची सुरुवात पुढील दोन-तीन महिन्यांत होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलाच्या (बीकेसी) धर्तीवर आता वडाळा येथे मिनी बीकेसी उभे राहणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या वडाळा ट्रक टर्मिनलची जागा आणि लगतच्या भूखंडावर एमएमआरडीए बीकेसीप्रमाणे नियोजनबद्धरित्या व्यवसाय केंद्र (कॉर्पोरेट हब) विकसित करणार आहे. त्यानुसार येथे वेगवेगळ्या कंपन्यांची कार्यालये यावीत, एमएमआरडीएला निधी उपलब्ध व्हावा म्हणून येथील भूखंडाचा लिलाव केला जाणार आहे. त्याची सुरुवात पुढील दोन-तीन महिन्यांत होणार आहे.

देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने आपली अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामध्ये एमएमआरडीएकडून महत्त्वाची भूमिका बजावली जात असून, वेगवान वाहतुकीसाठी पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. दरम्यान, सध्या वांद्रे-कुर्ला संकुलात काॅर्पोरेट कार्यालये झाली आहेत.

मध्यवर्ती केंद्र ठरणार

सध्या वडाळा ट्रक टर्मिनल येथे जाताना मोठी अडचण होते, मात्र भविष्यात वाहतुकीच्या दृष्टीने मध्यवर्ती केंद्र ठरणार आहे.

वांद्रे -कुर्ला संकुलाचे एकूण क्षेत्रफळ ३७० हेक्टर

वडाळा व्यवसाय केंद्राचे एकूण क्षेत्रफळ १५६ हेक्टर

  • पर्यायी जागेमुळे बिकेसीतील गर्दी कमी होणार व्यवसायिक जागा उपलब्ध

  • एमएमआरडीएकडून वडाळा-कासारवडवली दरम्यान उभारली जाणारी मेट्रो-४

  • अंधेरी-मंडाळे मेट्रो -२ बी

  • सध्या मोनोरेलची सुविधा उपलब्ध

  • अटल सेतूवरून सहजपणे पोहोचणे शक्य

  • वडाळ्यापासून नजीकच इस्टर्न फ्री वे

  • हार्बर मार्गिका असल्याने कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने वडाळा कार्पोरेट हब मध्यवर्ती ठिकाण होणार आहे.

दीर्घ मुदतीसाठी भाडेकरार

एमएमआरडीए वडाळा ट्रक टर्मिनलसह लगतच्या १५६ हेक्टर जागेवर कॉर्पोरेट हब उभारणार आहे. येथील जागा वेगवेगळ्या कंपन्यांना भाडेकरारावर उपलब्ध करून दिल्या जाणार असून, त्याबाबतचे नियोजन सुरू असल्याचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.

स्थलांतर?

वडाळा येथे ट्रक टर्मिनल आहे. त्या जागेवर मध्यवर्ती विकास केंद्र बनवले जाणार आहे. त्यामुळे सदरचे ट्रक टर्मिनल इतरत्र स्थलांतर करण्याचे नियोजन आहे. त्याबाबत संबंधितांशी चर्चा करून मार्ग काढला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: वडिलांसोबत दुचाकीवरून जात होती; तेवढ्यात काळानं घात केला अन्..., २० वर्षीय लेकीनं जीव गमावला

Pune Thar Donkey Viral Video : पुणेकरांचा नादच खुळा!, चक्क लाखोंची 'THAR' गाढवं समोर बांधून भररस्त्यानं वाजवत, ओढत नेली शोरूमला

Video : हर हर महादेव! कैलाश पर्वत सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालं..सुर्योदयाचा चमत्कारिक व्हिडिओ व्हायरल, दिवसभरात 10 लाख Views

मानधन नाही तर 'या' कारणासाठी शैलेश लोढांनी सोडला तारक मेहता का उल्टा चष्मा; स्वतःच उघड केलं कारण !

Navi Mumbai: नवी मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार! सर्वात वर्दळीच्या 'या' ठिकाणी ब्रिज बांधणार, कधी आणि कुठे ? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT