मुंबई

लग्नाच्या भूलथापातून लाखोंचा गंडा

CD

लग्नाच्या भूलथापातून लाखोंचा गंडा
कामोठेतील ४० वर्षीय महिलेची फसवणूक
पनवेल, ता. ९ (वार्ताहर) ः नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात राहणाऱ्या एका भामट्याने कामोठेतील ४० वर्षीय महिलेची तब्बल १६ लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात कामोठे पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामोठेत राहणाऱ्या पीडित महिलेने २०१८ मध्ये लग्न जुळवण्यासाठी एका वेबसाईटवर माहिती भरली होती. त्याचवेळी त्यांची नीलेश पाटील याची लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवरून ओळख वाढली होती. त्यानंतर भामट्या नीलेशने व्यावसायिक असल्याचे सांगून लग्नाच्या भूलथापा देत विश्वास संपादन केला. जून २०१८ ते जून २०२२ या कालावधीत पुणे रेल्वे स्थानक परिसरात अनेकवेळा भेट घेतली. तसेच व्यवसायातील गुंतवणुकीच्या बहाण्याने १६ लाख रुपये उकळले; मात्र महिलेने पैसे पुन्हा कधी मिळतील, अशी विचारणा केल्यानंतर विविध कारणे सांगून टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कामोठे पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली.
----------------------
पुणे पोलिसांकडे वर्ग
पोलिसांनी भामट्या नीलेश पाटीलविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याची सुरुवात पुणे रेल्वे स्थानक परिसरात झाल्याने पुढील तपासासाठी हा गुन्हा पुणे येथील बंडगार्डन पोलिस ठाण्यात वर्ग केल्याची माहिती कामोठे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक विमल बिडवे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: पुणे जिल्ह्यातील 'या' पंचायत समितीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे वर्चस्व

Pune ZP Result : फक्त लंगोट घालून सुनेच्या विजयाचा जल्लोष, अजितदादांच्या पठ्ठ्याचे फोटो VIRAL

Kolhapur Zilla Parishad results : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निकाल कागल, शिरोळ, हातकणंगले, करवीर, पन्हाळ्यात विजयी चित्र स्पष्ट

Raigad ZP Election: रायगड जिल्ह्यात पहिला विजय! कोणत्या पक्षाने खातं उघडलं?

सरपंच निर्मला नवलेंना मोठा धक्का, कारेगाव गणात पराभूत; किती मते पडली?

SCROLL FOR NEXT