उल्हासनगरात ‘ऑपरेशन ऑल आऊट’
८२ लॉज, १९२ वाहने, १३० हिस्टरीशीटर तपासले
२५९ पोलिसांची गुन्हेगारी अड्ड्यांवर धडाकेबाज मोहीम
उल्हासनगर, ता. १६ (वार्ताहर) : उल्हासनगरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुन्हा एकदा दमदार शक्ती प्रदर्शन करत ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवले. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीच्या शांततेला चिरत २५०पेक्षा अधिक पोलीस अधिकारी-अमलदारांनी गल्ली-बोळांपासून गुन्हेगारी अड्ड्यांपर्यंत धडाकेबाज मोहीम राबवली. दारूबंदी, जुगार, एनडीपीएस, सीओपीए अशा विविध गुन्ह्यांतर्गत धडक कारवाई करत झोन ४ पोलिसांनी उल्हासनगरमध्ये कायदा मोडणाऱ्यांना जागा नाही, असा स्पष्ट इशारा गुन्हेगारांना दिला आहे.
उल्हासनगर शहरातील वाढत्या गुन्हेगारी हालचालींना आळा घालण्यासाठी उल्हासनगर झोन ४ पोलिसांकडून १५ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत मध्यरात्री ‘ऑपरेशन ऑल आऊट’ पार पडले. रात्री १० ते पहाटे १ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या मोहिमेमध्ये विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी आणि शैलेश काळे यांनी थेट मैदानात उतरून प्रत्येक गुन्हेगार अड्ड्यावर कॉम्बिंग ऑपरेशनचे नेतृत्व केले. अधिकाधिक मनुष्यबळ तैनात ठेवून शहरभर ‘झिरो टॉलरन्स’ मोड सुरू करण्यात आला. या ऑपरेशनमध्ये ३९ अधिकारी आणि २२० अमलदार सहभागी झाले होते. दारूबंदी, जुगार, एनडीपीएस, सीओपीए , एमपीए, वॉरंट, शस्त्रसंबंधी गुन्हे तसेच लॉज- बार तपासणी, हिस्टरीशीटर तपासणी, नाकाबंदी अशा विविध पातळ्यांवर कारवाई करण्यात आली.
या संपूर्ण ड्राइव्हमध्ये एकाही व्यक्तीला अटक करावी लागली नाही, परंतु कारवाईची काटेकोरता आणि पोलिसांची सर्वव्याप्त उपस्थिती यांनी शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना प्रभावी धडा शिकवला. कारवाई दरम्यान प्रत्येक संशयित ठिकाण, मुख्य रस्ता, वस्ती, निर्जन परिसर आणि रात्री सक्रिय सक्रिय अड्ड्यांवर पोलिसांनी कडक तपासणी करून “उल्हासनगरात गुन्ह्याला स्थान नाही… पोलिसांचा दबदबा कायम राहील.” असा स्पष्ट इशारा दिला आहे.
===============================
प्रतिक्रिया
सचिन गोरे (पोलीस उपायुक्त, झोन -४)
“‘ऑपरेशन ऑल आऊट’ ही फक्त कारवाई नव्हे, तर उल्हासनगरातील कायदा-व्यवस्थेवरील आमची प्रतिबद्धता आहे. शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात पोलीस दलाची उपस्थिती जाणवावी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढण्याचा प्रयत्नही करू नये, हा आमचा स्पष्ट संदेश आहे. रात्रीचा अंधार, निर्जन रस्ते किंवा गुन्हेगारांचे अड्डे कुठेही पोलिसांची नजर पोहोचू नये, असे आता शक्यच नाही. आम्ही ‘झिरो टॉलरन्स’ मोडमध्ये आहोत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या प्रत्येक गुन्हेगारी हालचालीवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल.’”
===============================
मोहीमेतील प्रमुख कार्यवाही:
कायदेशीर कारवाई
दारूबंदी प्रकरणे ़ पाच
जुगार प्रकरण ़ एक
एनडीपीएस (सेवन)़चार
सीओपीए (तंबाखू) ़३९
वॉरंट कार्यवाही ़ तीन
एमपी अॅक्ट १४२ ़ एक
शस्त्र प्रकरण ़ एक
एकूण नोटिसा ़ ५६
-------------------------------------------------
तपासणी व धाड मोहीम
८२ लॉज व बार तपासणी – कोणतीही गैरकायदेशीर बाब आढळली नाही
१३० हिस्टरीशीटर/हद्दपार/गुंड तपासणी – एक नोटिस
वॉन्टेड आरोपी — शून्य
----------------------------------------------
नाकाबंदी व वाहतूक दंड
आठ ठिकाणी नाकाबंदी
१९२ वाहनांची तपासणी
४५,४००/- दंड आकारणी (वाहतूक विभाग मदतीने)
------------------------------------------------
एमपीए अंतर्गत गैरगुन्हे
३३ प्रकरणे (कलम १३१, १०२, ११७, ११२) – सर्वांना नोटिस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.