वसईत रहिवाशांचा ‘जलोत्सव’
उमेळमान परिसरात अमृत २.० मधून अतिरिक्त पाणीपुरवठा
वसई, ता. २६ (बातमीदार) : वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात वाढत्या लोकसंख्येला पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र सरकारच्या अमृत टप्पा २.० योजनेतून उमेळमान (प्रभाग २६) परिसरात अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याच्या कामाचा बुधवारी (ता. २६) शुभारंभ करण्यात आला.
उमेळमान (डायानगर, मध्य आळी) उमेळमान डायानगर, मद्ये आळी येथे बुधवारी सकाळी २०० मिमी व्यासाची जलवाहिनी अंथरण्याच्या कामाला सुरुवात झाली. या वेळी परिसरातील रहिवाशांनी, विशेषतः महिलांनी आरती ओवाळून आणि नारळ वाढवून आपला आनंद व्यक्त करीत एकप्रकारे ‘जलोत्सव’ साजरा केला. या भागातील पाण्याची समस्या लक्षात घेऊन बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी २०२४मध्ये वितरण व्यवस्था बळकटीकरण कामाचा शुभारंभ केला होता. माजी महापौर नारायण मानकर यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे उमेळमान येथे पुरेशा दाबाने पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. या शुभारंभावेळी माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज, माजी नगरसेवक सचिन घरत, प्रमिला पाटील यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि परिसरातील अनेक मान्यवर नागरिक व महिला मंडळ उपस्थित होते.
------------
४९४ कोटींची योजना
वसई-विरार शहरात पाण्याची समस्या सोडवण्यासाठी अमृत टप्पा २.० अंतर्गत नवी जलवाहिनी अंथरणे, तांत्रिक बिघाड दुरुस्त करणे आणि वितरण व्यवस्था वाढवण्यावर एकूण ४९४ कोटी ११ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. यामध्ये केंद्र, राज्य आणि महापालिका निधीचा समावेश आहे.
------------
रहिवाशांना पाणी मिळत आहे; मात्र जलवाहिनी बिघाड तसेच तांत्रिक अडचणी येत असतात. नव्याने जलवाहिनी अंथरण्याचे काम सुरू करण्यात आल्याने भविष्यात मुबलक पाणी मिळणार आहे.
- पुटुला गुप्ता, स्थानिक रहिवासी
-----------
बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर तसेच माजी महापौर नारायण मानकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अमृत टप्पा २ योजनेतून पाण्याची व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी काम सुरू केले आहे. त्यामुळे उमेळमान परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
- सचिन घरत, माजी नगरसेवक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.