मुंबई

दिवसाला १०० टँकरने पाणी पुरवठा

CD

दिवसाला १०० टँकरने पाणीपुरवठा
ठाणेकरांना आणखी चार दिवस पाणीटंचाई!
सकाळ वृत्तसेवा, ठाणे

ठाणे, ता. १५ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे जलशुद्धीकरण केंद्रातून येणारी मुख्य जलवाहिनी वारंवार फुटत असल्यामुळे ठाणेकरांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा असताना, जलवाहिनीला पुन्हा गळती लागल्याचे समोर आले आहे. यामुळे ठाणेकरांना १९ डिसेंबरपर्यंत म्हणजेच आणखी चार दिवस ५० टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.

पिसे बंधाऱ्यातून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून नेणारी १००० मिमी व्यासाची जलवाहिनी १० दिवसांमध्ये दुसऱ्यांदा फुटली आहे. यामुळे आधी ३० टक्के आणि आता ५० टक्के पाणीकपात ठाणे महापालिकेकडून लागू करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतील कल्याण फाटा येथील जलवाहिनी १० दिवसांपूर्वी फुटली होती. जुनी आणि प्रिस्ट्रेस काँक्रीट पद्धतीची ही जलवाहिनी तीन दिवसांनंतर दुरुस्त झाली, मात्र लगेचच दुसऱ्या ठिकाणी बिघाड झाल्याने पाणीकपात वाढवावी लागली.

टँकरवर वाढला ताण
पाणीकपातीची झळ आता अधिक तीव्र होऊ लागली आहे. नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर भागाला आधीच पाणी अपुरे पडत होते. त्यात ५० टक्के कपातीने भर टाकल्यामुळे येथील बहुतेक गृहसंकुलांना दररोज तीन ते चार टँकर मागवावे लागत आहेत.

खर्चात वाढ
पाणीकपात सुरू झाल्यामुळे टँकरचा हा खर्च दुपटीने वाढला असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. ठाणेकरांची पाण्याची गरज भागविण्यासाठी पालिका प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. पूर्वी दररोज ८० ते ८५ टँकर लागत होते, मात्र आता त्यात वाढ होऊन प्रतिदिन ९० ते १०० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Union Budget 2026: मोठी बातमी! 15,000 शाळा व 500 कॉलेजमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब्स, गेमिंगमध्ये 10 लाख नोकऱ्यांचा मार्ग मोकळा

Nashik Kumbh Mela : हवाई दळणवळण ते मोबाईल नेटवर्क; सिंहस्थासाठी केंद्रीय मंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घरोघरी करणार प्रचार; अजित पवार यांच्या चित्रफिती नागरिकांपर्यंत पोचविणार!

Union Budget 2026: होमस्टे, ई-व्हिसा आणि कनेक्टिव्हिटी वाढणार, परदेशात जाणे स्वस्त होणार; बजेटमध्ये मोठी घोषणा

Rohit Shetty Shootout : रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट! चार जणांना पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT