मुंबई

मुरूडमध्ये कला-क्रीडा महोत्सवाला सुरुवात

CD

मुरूडमध्ये कला-क्रीडा महोत्सवाला सुरुवात
रोहा अंजुमन, रेवा हायस्कूलसह रेवा ज्युनियर कॉलेजचा सहभाग
रोहा, ता. १६ (बातमीदार) : रोहा अंजुमन इस्लाम जंजिरा उर्दू हायस्कूल, रोहा एज्युकेशनल अँड वेल्फेअर असोसिएशन इंग्लिश मीडियम स्कूल तसेच रेवा ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक कला व क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. या महोत्सवाचे उद्‌घाटन रेवा संस्थेचे अध्यक्ष रियाज शेटे व अल-खैरीया कमिटीचे अध्यक्ष शफी पानसरे यांच्या हस्ते क्रीडा मशाल प्रज्वलन करून करण्यात आले.
रेवा व रोहा अंजुमन हायस्कूलच्या भव्य पटांगणावर सुरू झालेल्या या महोत्सवात कबड्डी, फुटबॉल, डॉजबॉल, लंगडी, गोळाफेक यांसारख्या विविध मैदानी क्रीडा स्पर्धांसह विज्ञान प्रदर्शन, फूड फेस्टिव्हल, फन फेअर अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सलग २० दिवस चालणाऱ्या या महोत्सवात शाळा व महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सहभागी होणार असून, त्यांच्या कला-क्रीडा गुणांना व्यासपीठ मिळणार आहे. या महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले असून, विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पारितोषिके देऊन गौरव करण्यात येणार आहे. उद्‌घाटन समारंभास रेवा संस्थेचे अध्यक्ष रियाज शेटे, अल-खैरीया कमिटीचे अध्यक्ष शफी पानसरे, रेवा संस्थेचे उपाध्यक्ष सलीम चोगले, सहसचिव करिम खतीब, अंजुमन हायस्कूलचे चेअरमन कादीर रोगे, अल-खैरीया संस्थेचे सचिव मुबीन करजिकर, रेवा संस्थेचे खजिनदार अरिफ अधिकारी, सदस्य उस्मान रोहेकर, तजम्मुल डबीर, राहील नागोठकर, अजीज महाडकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कवायत प्रदर्शनाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. कला, क्रीडा व विज्ञान यांचा समन्वय साधणारा हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बलाढ्य भाजपलाही दगाफटक्याची भीती; 'शिट्टीच्या' धसक्याने तब्बल 43 नगरसेवक अज्ञातस्थळी

DMart नव्हे, आता 'She Mart'! महिलांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा; नेमकी योजना काय?

Pune Porsche Accident : मोठी बातमी ! सुप्रीम कोर्टाकडून पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील ३ आरोपींना जामीन मंजूर, कोर्टाची महत्वाची टिप्पणी

Horoscope Prediction 2026: नशीब बदलणार! 3 फेब्रुवारीला बुध कुंभ राशीत, कन्यासह ‘या’ 5 राशींचा गोल्डन टाईम सुरु

Latest Marathi News Live Update : पुणे महानगरपालिकेत अजितदादांचा पुतळा उभारा, शिंदे सेनेची मागणी

SCROLL FOR NEXT