मुंबई

तलासरी येथे क्रीडा सप्ताह य्त्साहात

CD

परुळेकर महाविद्यालयात क्रीडा सप्ताह उत्साहात
पालघर, ता. १७ (बातमीदार) : तलासरी येथील कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर वरिष्ठ महाविद्यालयात १० ते १६ डिसेंबर या कालावधीत वार्षिक क्रीडा सप्ताहाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव देण्यासाठी आयोजित या सप्ताहात कबड्डी, खो-खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल, धावणे, गोळाफेक, बुद्धिबळ आणि कॅरम अशा विविध मैदानी व बैठ्या खेळांच्या स्पर्धा पार पडल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन आदिवासी प्रगती मंडळाचे सचिव कॉम्रेड रूपेश राणे, संचालक कॉम्रेड संदीप वावरे आणि प्राचार्य डॉ. भगवान राजपूत यांच्या उपस्थितीत झाले. उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि खेळ यांचा समतोल राखणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. प्राचार्य डॉ. भगवान राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभाग, सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या सप्ताहाच्या यशस्वी नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या मोठ्या सहभागामुळे महाविद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स 300 अंकांनी वाढला, कोणत्या शेअर्सला फायदा?

Jyotiba Temple Kolhapur : 'जोतिबाच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषात डोंगर दुमदूमणार; 'या' तारखेपासून देवाच्या खेट्यांना होणार प्रारंभ

Pune News: पुण्याहून मुंबई, हैदराबादला बुलेट ट्रेन! विक्रमी दोन लाख ८१ हजार ३७७ कोटींची तरतूद, नेमका कसा मार्ग..

Gold Rate Today : सोनं-चांदीत सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण! सोनं 9 हजार तर चांदी 50 हजारांनी स्वस्त; पाहा आजचा भाव

शेगाव येथे श्रींच्या १४८ व्या प्रगटदिन उत्सवास आजपासून सुरुवात; श्री संस्थानमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांची जय्यत तयारी!

SCROLL FOR NEXT