मुंबई

९०० विद्यार्थ्यांचा विविध स्पर्धांमध्ये सहभाग

CD

९०० विद्यार्थ्यांचा विविध स्पर्धांमध्ये सहभाग
महात्मा गांधी विद्यालय धसईचा क्रीडा महोत्सव

टोकावडे, ता. १८ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील जनसेवा शिक्षण मंडळ, मुरबाड संचालित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धसईच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन शालेय समितीचे अध्यक्ष श्रीधर घोलप यांच्या हस्ते पार पडले. महोत्सवात इयत्ता पाचवी ते दहावी सेमी व मराठी माध्यम तसेच इयत्ता अकरावी व बारावी कला, विज्ञान व व्यावसायिक शाखेतील मिळून सुमारे ९०० विद्यार्थ्यांनी विविध वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. धावणे, लांब उडी, उंच उडी, खो-खो, कबड्डी आदी स्पर्धांचा समावेश होता.
या वेळी मुरबाड उपविभागीय पोलीस अधीक्षक अनिल लाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाचे महत्त्व अधोरेखित करत शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण व आत्मविश्वास वाढीसाठी क्रीडा स्पर्धा उपयुक्त ठरतात, असे प्रतिपादन केले. क्रीडा महोत्सव यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्राचार्य संतोष सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवर्गाचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बलाढ्य भाजपलाही दगाफटक्याची भीती; 'शिट्टीच्या' धसक्याने तब्बल 43 नगरसेवक अज्ञातस्थळी

DMart नव्हे, आता 'She Mart'! महिलांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा; नेमकी योजना काय?

Pune Porsche Accident : मोठी बातमी ! सुप्रीम कोर्टाकडून पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील ३ आरोपींना जामीन मंजूर, कोर्टाची महत्वाची टिप्पणी

Horoscope Prediction 2026: नशीब बदलणार! 3 फेब्रुवारीला बुध कुंभ राशीत, कन्यासह ‘या’ 5 राशींचा गोल्डन टाईम सुरु

Latest Marathi News Live Update : पुणे महानगरपालिकेत अजितदादांचा पुतळा उभारा, शिंदे सेनेची मागणी

SCROLL FOR NEXT