ठाणे, घोडबंदरमध्ये पाणीबाणी
कपातीच्या वेळापत्रकापूर्वीच पाणीपुरवठा विस्कळित
ठाणे, ता. २९ : भातसा नदीवरील पिसे बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामाचा फटका ठाणेकर आणि घोडबंदरवासीयांना बसू लागला आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या विभागवार पाणीकपातीच्या वेळापत्रकापूर्वीच अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
मुंबई महानगरपालिकेकडून ‘न्युटिक गेट सिस्टीम’च्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे नदीतील पाणीपातळी घटली असून, ठाणे पालिकेच्या पाणी उचलण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. ७ फेब्रुवारीपर्यंत शहरभर विभागवार एक दिवस पाणीकपात लागू करण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात कपातीचा दिवस नसतानाही कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांच्या नियोजनाचा गोंधळ उडाला आहे. घोडबंदर भागात पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीत गळती झाल्याने या भागातील समस्या अधिकच गंभीर झाली आहे.
प्रशासनाची भूमिका
घोडबंदर परिसरातील जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. मात्र, दुरुस्ती कामामुळे जोपर्यंत पाणीपातळी पूर्ववत होत नाही, तोपर्यंत पाणीटंचाईचे सावट कायम राहण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.