किरीट सोमय्यांनी घेतला घाटकोपर स्थानक रोडचा आढावा
फुटपाथवरील अतिक्रमण; बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांवर कारवाईची मागणी
घाटकोपर, ता. ३१ (बातमीदार) ः घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी स्थानक रोड परिसराचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. सोमय्या येणार असल्याची माहिती मिळताच स्थानक रोड व एम. जी. रोडवरील फेरीवाल्यांनी फुटपाथ तात्पुरते रिकामे केल्याचे चित्र दिसून आले.
या पाहणीदरम्यान नगरसेवक धर्मेश गिरी, नगरसेविका रितू तावडे, राखी जाधव, अर्चना भालेराव यांच्यासह पोलिस व महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतरही सोमय्यांनी स्थानक रोड व एम. जी. रोड परिसराची सखोल पाहणी सुरू ठेवली. या वेळी सोमय्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, या परिसरात बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोर बेकायदेशीररीत्या व्यवसाय करत असून, त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी. अतिक्रमणामुळे नागरिकांचे हाल होत असून, रस्ते व फुटपाथ पूर्णतः मोकळे करण्यात यावेत, असे निर्देश त्यांनी दिले. याचप्रमाणे, मागील आठवड्यात भांडुप रेल्वे स्थानक परिसरातही सोमय्यांनी पाहणी केली होती. त्या वेळीही रेल्वे प्रशासन व महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. संपूर्ण रस्ता अतिक्रमणमुक्त न केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिला होता.
सध्या घाटकोपरच्या एम. जी. रोडवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले असून नागरिकांना चालणेही अवघड झाले आहे. तसेच स्थानक रोडवर दोन डझनहून अधिक रिक्षा स्टँड उभे राहिल्याने शेकडो रिक्षांची गर्दी होत असून, यामुळे सतत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.