‘महानगर, महापालिका आणि नागरिक’ विषयावर मंथन
मालाड, ता. ३० (बातमीदार) ः केशव उर्फ बंडू गोरे यांच्या ६७व्या स्मृतिदिनानिमित्त केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महानगर, महापालिका आणि नागरिक’ या महत्त्वपूर्ण विषयावर सोमवार, दि. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून, या वेळी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आपले विचार मांडणार आहेत.
गोरेगाव (पश्चिम) येथील आरे रोडवरील केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे. मुंबईसारख्या महानगराचा झपाट्याने होत असलेला विस्तार, महापालिकेची कार्यपद्धती आणि त्यामध्ये नागरिकांचा सहभाग या त्रिसूत्रीवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. मृदुल निळे आणि ज्येष्ठ पत्रकार अभिजीत करंडे उपस्थित राहणार आहेत. महानगराच्या जडणघडणीत प्रशासकीय यंत्रणेसोबतच सजग नागरिक म्हणून आपली भूमिका काय असावी, याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला गोरेगाव तसेच परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केशव गोरे स्मारक ट्रस्टचे विश्वस्त आणि आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.