मुंबई

वसई-विरारला जलसंजीवनी

CD

वसई-विरारला जलसंजीवनी
वाहिन्या टाकण्याच्या कामाला पालिकेकडून वेग
वसई, ता. ३१ (बातमीदार)ः वसई-विरार शहरातील जुन्या जलवाहिन्यांमुळे पाणी वितरणावर विपरित परिणाम होत होता. याच अनुषंगाने पालिकेने अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे भविष्यात वसई-विरारकरांना मुबलक पाणी मिळणार आहे.
वसई-विरार शहराची लोकसंख्या वाढत आहे. टोलेजंग इमारती, बैठ्या वस्तींबरोबर ग्रामीण भागांतील घरांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला मूलभूत सुविधा देण्याचे आव्हान आहे. शहरातील पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा असून, नागरिकांना मुबलक, नियमित पाणी मिळावे यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत. पेल्हार, उसगाव, सूर्या पाणीपुरवठा योजनेतून नागरिकांना पाणी मिळत आहे, पण जुन्या जलवाहिनी, तांत्रिक अडचणी तसेच कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अमृत पाणीपुरवठा योजनेचे उद्‍घाटन हितेंद्र ठाकूर यांनी आमदार काळात वसईत केले. त्यानंतर पाणीपुरवठा योजना बळकटीकरण, विस्तारीकरणाचे काम मंजूर झाले होते. एकीकडे नव्या पाणीपुरवठा योजनांना गती येत असताना दुसरीकडे नव्या जलवाहिन्या, जलकुंभ उभारणीमुळे वसई-विरार शहराला जलसंजीवनी मिळणार आहे.
--------------------------------
४९४ कोटींचा खर्च
वसई-विरार शहरात पाणी वितरण सुरळीत करण्यासाठी ठिकठिकाणी कामे सुरू आहेत. यासाठी ९४, ५५ किलोमीटरच्या मुख्य जलवाहिन्या तर ४९६ किलोमीटरच्या वितरित जलवाहिन्यांचा समावेश आहे. रस्ते खोदकामाच्या खर्चाचा समाविष्ट असून, जल साठवणूक करण्यासाठी १० जलकुंभ, मुख्य जलवाहिनी, रेल्वे क्रॉसिंगसाठी जलवाहिनीनंतर वितरण, कामे हाती घेतली आहेत. जुन्या जलवाहिन्या बदलल्याने पुरेशा दाबाने पाणी मिळणार आहे.
----------
कामाचा आढावा
वसई-विरार शहरात - ४९६ किमी
जलवाहिन्या - १०५ किमी
पूर्ण झालेले काम - ५२ किमी मुख्य जलवाहिनी
--------------------
वसई-विरारकरांना मुबलक पाणी मिळावे, म्हणून मुख्य, अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे भविष्यात वसई-विरार शहरातील नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.
- अजीव पाटील, नगरसेवक, बविआ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीला! सिल्व्हर ओक निवासस्थानी सांत्वन भेट

Manipur Government Formation Update: मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग!, भाजपसह सर्व ‘NDA’ आमदारांना दिल्लीला बोलावले

Latest Marathi News Union Budget 2026: व्हेनेझुएलाकडून भारत तेलाची खरेदी करणार - डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

Nagpur Municipal Corporation: नागपूर महानगरपालिकेत भाजपने १०२ नगरसेवकांचे राजीनामे घेतले; नेमकं कारण काय?

Pune News : वैद्यकीय पर्यटनाला मिळेल चालना, आयात शुल्क कमी केल्याने औषधे स्‍वस्‍त; आरोग्य क्षेत्रातील तज्‍ज्ञांनी व्‍यक्‍त केले समाधान

SCROLL FOR NEXT