मुंबई

वयोवृद्ध दांम्पत्याची ९ लाखांची फसवणूक

CD

वृद्ध दाम्पत्याला नऊ लाखांचा गंडा
ठाणे, ता. ३१ : टेलिकॉम विभाग आणि क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवून घोडबंदर रोडवरील एका ६८ वर्षीय वृद्ध महिलेसह त्यांच्या ७५ वर्षीय पतीची नऊ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी दोन भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे.

कावेसर भागात राहणाऱ्या तक्रारदार महिलेला १७ जानेवारी रोजी ‘अरुण कुमार’ नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने आपण टेलिकॉम डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून विश्वासात घेतले. त्यानंतर ‘सचिन यादव’ नावाच्या दुसऱ्या व्यक्तीने क्राइम ब्रँच अधिकारी असल्याचे सांगून महिलेला धमकावले. तुमच्या मोबाईल क्रमांकावरून अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवले जात असून, तुमचा संबंध मनी लाँड्रिंग प्रकरणाशी आहे, असा बनाव रचण्यात आला. आरबीआयकडून पडताळणी व्हायची आहे, असे सांगून या वृद्ध दाम्पत्याला काही काळ ‘डिजिटल कस्टडी’मध्ये ठेवण्यात आले. अटकेची भीती दाखवून भामट्यांनी या दाम्पत्याकडून त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली आणि नऊ लाख रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास भाग पाडले.

गुन्हा दाखल
पैसे देऊनही ते परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे या दाम्पत्याच्या लक्षात आले. याप्रकरणी पोलिसांनी अरुण कुमार आणि सचिन यादव या दोघांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस या सायबर भामट्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

WPL 2026: Mumbai Indians चे आव्हान संपले! दिल्ली कॅपिटल्सच्या युपीवरील विजयाने प्लेऑफचं चित्र स्पष्ट

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

SCROLL FOR NEXT