मुंबई

श्रीवर्धन–हरिहरेश्वर मार्गावर धोका वाढला

CD

श्रीवर्धन-हरिहरेश्वर मार्गावर धोका वाढला
बापवन-निगडी परिसरात रस्त्यालगत खड्डे व खचलेली कड; अपघाताची भीती
श्रीवर्धन, ता. २१ (बातमीदार) : श्रीवर्धन-हरिहरेश्वर या महत्त्वाच्या पर्यटन मार्गावरील बापवन व निगडी गावालगतचा रस्ता ठिकठिकाणी खचल्याने वाहतुकीस गंभीर धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली असून, अपघाताची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्ता अधिकच धोकादायक ठरत असल्याने पर्यटकांसह स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याची कड पूर्णतः खचलेली असून, साईडपट्टीच नसल्याने वाहनचालकांना रस्त्याच्या मध्यभागातूनच वाहतूक करावी लागत आहे. समोरून येणाऱ्या वाहनांना जागा देताना किंवा ओव्हरटेक करताना थेट अपघाताची परिस्थिती निर्माण होत आहे. दुचाकीस्वार, रिक्षाचालक तसेच खासगी चारचाकी वाहनांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. हरिहरेश्वर हे कोकणातील प्रमुख पर्यटनस्थळ असल्याने सुट्ट्यांच्या काळात मोठी वर्दळ असते; मात्र अनोळखी मार्ग, अरुंद रस्ता व खचलेली कड यामुळे वाहनांचे नियंत्रण सुटण्याची भीती कायम आहे.

चौकट
सूचनाफलकाची मागणी
स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालकांकडून तातडीने रस्त्याची दुरुस्ती, साईडपट्टीची निर्मिती आणि धोकादायक ठिकाणी सूचनाफलक लावण्याची जोरदार मागणी होत आहे. अन्यथा संभाव्य अपघातांची जबाबदारी कोणाची, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

प्रतिक्रिया
सध्या श्रीवर्धन-बोर्ली मार्गावर रस्त्याचे काम सुरू आहे. त्यांनतर हरिहरेश्वर येथे काम सुरू होणार आहे तेव्हा त्या मार्गावरील साईडपट्टी दुरुस्ती करू.
- तुषार लुंगे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, श्रीवर्धन

छायाचित्र : बापवन व निगडी येथील रस्त्यालगत खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Union Budget 2026 Live : गरीबी दूर करण्यावर लक्ष्य केंद्रीत केलंय - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Union Budget: फिस्कल डेफिसिट, राजकोषीय धोरण अन्... केंद्रीय अर्थसंकल्पातील कठीण आर्थिक शब्दांचे सोपे अर्थ बजेट आधीच समजून घ्या...

Chhatrapati Sambhajinagar Crime:‘मोस्ट वाँटेड’ ब्रोकर राजू जाधव जेरबंद; बनावट महिलांना उभे करून ७० लाखांचा जमीन गैरव्यवहार!

Epstein Files Controversy : एपस्टीन फाइल्समध्ये पंतप्रधान मोदींचा उल्लेख? काँग्रेसच्या आरोपानंतर परराष्ट्र मंत्रालयाने अखेर दिलं स्पष्टीकरण...

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प व्हेनेजुएलाचं तेल जगभरात विकण्यासाठी उतावीळ; म्हणाले - भारताचा खरेदीसाठी पुढाकार, चीनचंही स्वागत

SCROLL FOR NEXT